IIT Bombay : मोहालीनंतर IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार, एकाला अटक

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested

मुंबई : मुलींचा एमएमएस लीक झाल्याच्या घटनेवरून पंजाबच्या चंदीगड विद्यापीठात वाद सुरू आहे, यादरम्यान आता दुसरीकडे, आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावताना पकडल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमध्ये नाईट ड्युटी करत असलेला हा कर्मचारी रविवारी रात्री मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावत होता. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यावर तो मुलींचे व्हिडिओही बनवत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

रविवारी रात्री ही बाब समोर आली. मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये खिडकीतून कोणीतरी डोकावताना एका विद्यार्थिनीने पाहिले. यानंतर त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना याची माहिती दिली. त्याचवेळी आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. इन-हाउस मॅगझिनमध्ये जारी केलेल्या निवेदनानुसार हे प्रकरण वसतिगृह-10 चे आहे. पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी येथील कॅन्टीन रविवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र येथे काम करणारे कर्मचारी रात्री वसतिगृहाच्या आवारातच थांबले. या निवेदनानुसार, वसतिगृहाच्या इमारतीच्या काही विंगमध्ये बाथरूमच्या खिडक्या प्लॅटफॉर्मप्रमाणे बनवल्या गेल्या आहेत आणि त्या पाईप्सद्वारे तळमजल्याशी जोडलेल्या आहेत. या पाईपच्या साहाय्याने तो खिडकीपर्यंत पोहोचला होता, असे सांगण्यात आले आहे.

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात राऊतच दोषी; ईडीकडून ४ हजार पानी आरोपपत्र दाखल

व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप

मिड डे च्या रिपोर्टनुसार आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थिनीने पवई पोलिसांकडे तक्रार केली की रविवारी रात्री आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने हॉस्टेल 10 च्या बाथरूममध्ये तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी कलम 354C (voyeurism) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, कॅन्टीन कर्मचाऱ्याविरुद्ध आयपीसी कलम 354 सी (voyeurism) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री त्या कर्मचाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.

आयआयटी बॉम्बेच्या प्रवक्त्याने सांगितले की, वसतिगृह-10 मधील राहणाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हेगार पकडला गेला. त्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांनी सांगितले की, वसतिगृहाच्या नाईट कॅन्टीनचे कर्मचारी पाईप डक्टच्या मदतीने चढून बाथरूममध्ये डोकावत होता. संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रवक्त्याने सांगितले की, आरोपींनी कोणतेही फुटेज शेअर केले आहे की नाही याबद्दल संस्थेकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. त्याचवेळी पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डिंग उघड झाले नाही. मात्र, आरोपीला बाथरूमच्या खिडकीतून डोकावताना पकडले. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

iit bombay canteen employee peeping in girls hostel bathroom arrested
Vedanta-Foxconn : महाराष्ट्रात जागा निश्चित, गुजरातेत शोध सुरू; रोहित पवारांनी वेधलं लक्ष

चंदीगड विद्यापीठात नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे वसतिगृहात एका विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवून प्रियकराला पाठवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयआयटी मद्रासमध्ये अशीच एक घटना घडली होती. येथेही एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला विद्यार्थिनीवर मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com