बदलापुरात बांधकामांचा महा‘पूर’  

वालिवली पुलाजवळील बंगल्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी
वालिवली पुलाजवळील बंगल्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी

बदलापूर : ‘येरे माझ्या मागल्या...’ या म्हणीप्रमाणे बदलापूर शहरात उल्हास नदीकाठी बांधकामांचाच महापूर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. २६ जुलै २००५ ला आलेल्या महाभयंकर पुरामुळे जवळपास सर्वच यंत्रणांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. काय करायला हवे होते आणि काय टाळायला हवे, हे सर्व त्यानिमित्ताने स्पष्ट झाले होते; मात्र या सर्व गोष्टींना काही दिवस महत्त्व देऊन नंतर सर्वच यंत्रणा जुन्या पद्धतीने कारभार करू लागल्या. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. पालिका प्रशासन म्हणते उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषाच अस्तित्वात नाही, तर पाटबंधारे विभाग म्हणते उल्हास आणि भातसा नदीच्या पूरनियंत्रण रेषा या पूर्वीच स्पष्ट केल्या आहेत; मात्र दोन्ही प्रशासनाच्या असमन्वयाचा फटका नागरिकांना बसत आहे. 

२६ आणि २७ जुलै २०१९ ला झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली. त्यामुळे नदीपात्रात तसेच नदीच्या किनाऱ्यावर नव्याने विकसित झालेल्या गृहप्रकल्पांना याचा फार मोठा फटका बसला. २००५ च्या पुरानंतर बदलापूरच्या विकासात पुराचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र २००५ च्या पुरातून संबंधित यंत्रणा काही एक शिकले नाही, हे उघड झाले. विकासाच्या नावाखाली बेदरकारपणे पूररेषेत केलेले बांधकाम सर्वाधिक कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. 

उल्हास नद्यांना येऊन मिळणाऱ्या बारवीसारख्या उपनद्यांची पूररेषा पाटबंधारे खात्याने निश्‍चित केली आहे. ठाणे जिल्ह्यात उल्हास आणि भातसा या दोन नद्यांची पूररेषा निश्‍चित केली आहे. काळू आणि शाई नदीच्या पूर नियंत्रण रेषेचे काम प्रगतिपथावर आहे. 
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

पूर रेषेबाबतची सर्व जबाबदारी ही लघू पाटबंधारे विभागाची आहे; मात्र कर्जतपासून मिरा-भाईंदरपर्यंत पूररेषा अजूनही निश्‍चित झालेली नाही. बदलापुरात यापुढे उल्हास नदीच्या परिसरातील भागात तळमजल्यावर सदनिकांना मंजुरी न देण्याचा ठराव मंजूर करून सरकारकडे पाठविला जाईल.
- प्रकाश बोरसे,  मुख्याधिकारी.

कोणी चुका केल्या या वादात न पडता भविष्यात अशा प्रकारे कोणाचेही नुकसान होऊ नये. जीवित वा वित्तहानी होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकत्र घेऊन नियोजन करावे लागणार आहे. महापुरात वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचे पंचनामे सुरू असून नुकसानभरपाई देण्यात येईल.
- किसन कथोरे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com