
किन्हवली : दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याची घटना शहापूर तालुक्यातील शहापूर वन क्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे.याबाबत वन परीक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांना काहीच माहिती नसल्याचे समोर आल्याने याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.कधी काळी विपुल वनसंपत्ती असलेल्या झाडांना नष्ट करण्याचा विडा जंगल माफियांनी वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उचलला आहे की काय,अशी शंका येऊ लागली आहे.