तब्बल एक हजार कोटींचा अवैध माल; नाव्हा शेव्हाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, कसं डोकं वापरलेलं वाचा

सुमित बागुल
Monday, 10 August 2020

मुंबईत समुद्रमार्गे मोठा व्यापार चालतो. समुद्रमार्गे मुंबईत अनेक गोष्टी येत जात असतात. समुद्र मार्गाने येणाऱ्या मालाची कैक कोटींमध्ये उलाढाल असते.

मुंबई : मुंबईत समुद्रमार्गे मोठा व्यापार चालतो. समुद्रमार्गे मुंबईत अनेक गोष्टी येत जात असतात. समुद्र मार्गाने येणाऱ्या मालाची कैक कोटींमध्ये उलाढाल असते. बरं, मुंबईचं आणि अंडरवर्ल्डचं नातं जुनं आहे. समुद्रमार्गेच मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांसाठी RDX देखील आलंय. अनेकदा मुंबईतील बंदरांवरून ड्रग्स पकडले गेलेत. मात्र आता जी कारवाई करण्यात आलीये ती आतापर्यंतची सर्वात मोठी  कारवाई आहे. 

नुकतीच नवी मुंबईतील नाव्हा शेव्हा पोर्टवर एक मोठी कारवाई करण्यात आलीये. यामध्ये DRI‌ ने म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाने धडक कारवाई करत तब्बल एक हजार कोटींचे ड्रग्स पकडलेत. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत हे ड्रग्स थेट अफगाण आणि इराणमधून आल्याचं समोर येतेय. 

महत्त्वाची बातमी - भाऊ, ताई, मुंबईत कोरोना संपला का ? मग असं का बरं वागताय?

ड्रग्स तस्करीचा नवा फंडा : 

यावेळी ड्रग्स तस्करांनी एक वेगळा फंडा वापरल्याचं समजतंय. प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये हेरोइन्स नामक अमली पदार्थ (Drugs) भरून तो मुंबईत आणला जात होता. भीषण गोष्ट म्हणजे, या पाईप्सना लाकडी बांबूप्रमाणे रंग मारण्यात आलेला. या सर्व माल आयुर्वेदिक सामग्रीच्या नावावर मुंबईत आणला जात होता. या हेरॉईनची किंमत तब्बल एक हजार कोटी असल्याचं समजतंय. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आता कस्टम एजंट्सला ताब्यात घेतलंय. त्यापैकी एकाचं नाव मिनानाथ बोडके आणि दुसऱ्याचं नाव कोंडीराम गुंजाळ असं आहे. मीनानाथला नवी मुंबईतील नेरूळमधून तर कोंडीरामला ठाण्यातील मुंब्य्रातून ताब्यात घेण्यात येत आहे. या प्रकरणी दिल्लीतूनही एक अटक करण्यात आलीये. 

महत्त्वाची बातमी -  ‘हनी-ट्रॅप’मुळे सराईत आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात  

दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल चौकशी केली जातेय आणि या प्रकरणी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

illegal powder woth one thousand crore busted from navha sheva port of navi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal powder woth one thousand crore busted from navha sheva port of navi mumbai