मुंबईकरांनो सावधान ! पुढचा आठवडाभर मुंबईत पुन्हा धुवाधार

मुंबईकरांनो सावधान  ! पुढचा आठवडाभर मुंबईत पुन्हा धुवाधार

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण येत्या सोमवारपासून म्हणजेच १० तारखेपासून मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. मुंबई सोबत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आठवडाभर पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक यांच्या माहितीनुसार पुन्हा एकदा पश्चिम किनारपट्टीच्या लगत मान्सून सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा देखील तयार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुंबईत येत्या सोमवारपासून म्हणजेच दहा ते अकरा तारखेपासून पुढे आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

मुंबईसह सोबतच महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ अशा विविध भागात पुहा एकदा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलं आहे.    

या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना २६ जुलैच्या पावसाची आठवण करून दिली होती. या आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी धुवाधार पाऊस बरसला होता. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडणे, अनेक इमारतींचे छप्पर उडून जाणे असे प्रकार घडले होते. मुंबईत बरसलेल्या पावसाने गेल्या ४६ वर्षातील पावसाचा रेकॉर्डही मोडीत काढला होता. दरम्यान या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान वाऱ्यांचा वेहगही भयंकर होता.   

IMD forecasts heavy rain in mumbai and suburbs from monday onwards

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com