
जातीयवादी राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना तात्काळ अटक करा - प्रवीण गायकवाड
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण करत आहेत त्यामुळं त्यांना तात्काळ अटक करुन शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. त्याचबरोबर खोटा इतिहास सांगून राज ठाकरे महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत आहेत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. (Immediately arrest Raj Thackeray for engaging in racist politics Praveen Gaikwad)
गायकवाड म्हणाले, "सध्या महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. लोकशाहीमध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं पाहिजे ते होत नाहीए. खोड्या इतिहास सांगून राज ठाकरे महाराष्ट्राच वातावरण बिघडवतं आहेत. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा ना जिर्नोद्धार केला ना ती शोधली. महात्मा फुल्यांनी सर्वप्रथम ती शोधली, पोवाडा लिहिला आणि शिवजयंती देखील सुरु केली"
त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं स्मारकं भांबुर्ड्यात केलं. त्यानंतर इंदूरचे होळकर आणि ब्रिटिशांनी १९१७ मध्ये शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार केला. टिळकांनी समाधीच्या जिर्णोद्धारासाठी पैसा गोळा केला होता. पण सन १९२० मध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर तो पैसा तसाच शिल्लक राहिला पण त्याचा उपयोग झाला नाही. नंतर न. चि. केळकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारील पुतळाबाईची समाधी होती, त्यावर वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवलं. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार बाजूलाच राहिला पण वाघ्या कुत्र्याचं शिल्प बसवून पुतळाबाईचा अपमान केला आहे. त्यामुळं लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्नोद्धार केल्याचा खोटा इतिहास राज ठाकरे सांगत आहेत.
माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड यांनी जेम्स लेनचं मूळ पुस्तकही सादर केलं. या पुस्तकातील पान क्रमांक ९१ वर जेम्स लेननं वादग्रस्त लिखाण केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच प्रकारचं लिखाण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या कादंबरीत काव्यमयरित्या १२६ पानावर केल्याचं यावेळी प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं.
Web Title: Immediately Arrest Raj Thackeray For Engaging In Racist Politics Praveen Gaikwad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..