पुनर्विकासातल्या अडचणी तत्काळ दूर करा; बीडीडी चाळींसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 5 September 2020

वरळी येथील एन. एम. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

मुंबई : वरळी येथील एन. एम. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. 

स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

वरळी येथे बीडीडी चाळीत 9600 भाडेकरू असून, त्यांची आवश्‍यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबिर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण झाले पाहिजे, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. याकामी महसूल विभागाकडून आवश्‍यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली. ना. म. जोशी मार्ग येथे 32 चाळी असून, 2500 भाडेकरू आहेत; तर नायगाव येथे 42 चाळी आणि 3300 भाडेकरू आहेत. तेथील पुनर्विकास प्रक्रियेतील समस्या तातडीने दूर करून विकासास सुरुवात करावी. भाडेकरूंचे योग्य स्थलांतर करावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारीदेखील उपस्थित होते. 

ब्रेकिंग! रिया चक्रवती, शौविक आणि मिरांडाची एनसीबीडून अटक

तीन वर्षांपासून रखडपट्टी 
प्रधान सचिव गृहनिर्माण एसव्हीआर श्रीनिवास यांनी प्रारंभी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली, तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून, त्याबाबतही येणाऱ्या अडचणींचा उहापोह त्यांनी केला. यावेळी पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी दर काही दिवसांनी आढावा घेण्यात यावा, अशीही मुख्यमंत्र्यांनी केली. 
 
-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediately remove difficulties in redevelopment; Chief Ministers instructions regarding BDD