जुहूमध्ये बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिक भिडले

सर्व युवा सैनिकांना जुहू येथे जमण्याचे आदेश देण्यात आले होते.
जुहूमध्ये बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिक भिडले
Updated on

मुंबई: नारायण राणेंच्या (narayan rane) वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांची (shivsainik) राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलनं (protest) सुरु आहेत. काही ठिकाणी राणेंच्या फोटोला काळे फासण्यात आले, तर काही ठिकाणी प्रतिकात्मक पुतळण्याचे दहन करण्यात आले. अपेक्षेप्रमाण सर्व आंदोलनांना हिंसेची (violence) किनार आहे.

नाशिकमध्ये भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यात आली, तर पुण्यात मॉलवर दगडफेक झाली आहे. मुंबईतही शिवसैनिक आणि राणे समर्थक परस्परांना भिडले. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर युवा सेना आक्रमक झाली आहे. सर्व युवा सैनिकांना जुहू येथे जमण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हे युवा सैनिक जमले होते. जुहू येथे राणेंचा बंगला आहे. युवा सैनिकांप्रमाणे भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुहूमध्ये बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिक भिडले
नारायण राणेंना अटक होऊ शकते?, काय सांगतो कायदा

राणेंच्या बंगल्याबाहेर युवा सेना आणि राणे समर्थकांची झडप झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com