esakal | महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार?

sakal_logo
By
दीनानाथ परब

महाराष्ट्रात लॉकडाउन (maharashtra lockdown) ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही टोपे यांनी स्पष्ट यांनी केले. लॉकडाउनचा दुसरा टप्पा १५ मे रोजी संपणार आहे. "लॉकडाउन केल्यानंतर ७ लाखापर्यंत पोहोचलेली रुग्णसंख्या आता ४.७५ लाखापर्यंत पोहोचली आहे." (In maharashtra lockdown may extended to 31 st may)

"मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राच प्रति दिन ग्रोथ रेट पॉईंट ८ आहे. म्हणजे एकूण भारताच्या ग्रोथ रेटच्या निम्मा आहे" असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा: 'खिशात ठेवलेले राजीनामे तेव्हा का नाही बाहेर काढले?'

"लॉकडाउनमुळे निश्चित प्रकारे पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. आपल्याकडे रुग्णसंख्या कमी होतेय. इतर राज्य आपल्या पुढे आहेत. लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढवण्यात यावा" अशी अपेक्षा मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री त्याबद्दल अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

loading image
go to top