मुंबईत आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

जंगलातील निर्जनस्थळी आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी पीडितेला त्याने मारहाण ही केली.
मुंबईत आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
Updated on

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरातून (kurla area) एका अल्पवयीन मुलीचे (minor girl) अपहरण करून आरेच्या जंगलात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला आरे पोलिसांनी (aarey police) अटक केली आहे. सद्दाम हुसेन अबुबकर खान(२९) असे या आरोपीचे नाव असून तो गोरेगाव मैत्रीपार्क फ्लिमसिटी रोड (filmcity road) परिसरात राहणारा आहे. (In mumbai Aarey forest accused attempt to rape on minor girl dmp82)

कुर्ला पाईपरोड परिसरात पीडित मुलगी ही कुटुंबियांसोबत राहते. 25 जुलैच्या रात्री आरोपीने तिचे अपहरण करून तिला आरे जंगल परिसरात नेले. जंगलातील निर्जनस्थळी आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला. यावेळी पीडितेला त्याने मारहाण ही केली.

मुंबईत आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
पॉर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

पीडितेचा रडण्याचा आवाज ऐकून तिला वाचवण्यासाठी गेलेल्या स्वप्निल नावाच्या मुलांच्याही डोक्यात आरोपीने दगड मारून त्याला जखमी केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सद्दाम हुसेन अबुबकर खान(२९) याला अटक केली. त्याच्यावर कुर्ला परिसरातही अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने या पूर्वीही अशा प्रकारचे कृत्य केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी आरे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur crime news POCSO case
Sangli ishwarpur Minor Girl Assault Case police arrest
Pune Crime News
Gondia Minor Girl Molestation Attempt Case
Marathi News Esakal
www.esakal.com