मुंबईत अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारच्या आत...

मुंबईत आज दिवसभरात 71 रुग्णांचा मृत्यूची नोंद
Mumbai corona Virus Updates
Mumbai corona Virus UpdatesGoogle

मुंबई: रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा (mumbai active corona patient)आकडा कमी होऊन 49,499 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर (corona growth rate) 0.51 पर्यंत खाली आला आहे. आज 3039 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6,71,374 इतकी झाली आहे.

मुंबईत गुरुवार 4052 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,06,435 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 49,499 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.  मुंबईत आतापर्यंत 56,44,402 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.51 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 138 दिवसांवर आला आहे. (In mumbai active corona patient number comer under 50 thousand)

Mumbai corona Virus Updates
मुंबईत लसींचा नाही पत्ता, BMC कडून लस केंद्राच्या उदघाटनांचा सपाटा

मुंबईत आज दिवसभरात 71 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 687  वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 43 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 45 पुरुष तर  26 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 19 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 49 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

Mumbai corona Virus Updates
महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिलमध्ये ६० हजारपेक्षा जास्त मुले कोरोनाबाधित

मुंबईत 96 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 617 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,735 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 924 करण्यात आले.

धारावीत 18 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 18 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6592 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 22 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9096 झाली आहे. माहीम मध्ये 39 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9250 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 79 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,938 झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com