मुंबई: सामान्यांना लस नाही, कॉर्पोरेट लसीकरण मात्र जोरात

लसीकरणात खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयांना मागे सोडले
Vaccination
Vaccinationesakal

मुंबई: मुंबईत कोविड लसींचा (covid vaccine) तुटवडा भासत असल्याने शासकीय लसीकरणाची मोहीम थंडावली आहे. याउलट खासगी कार्यालयात कॉर्पोरेट लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे चित्र आहे. सामान्य परिस्थिती असलेले लोक हजार रुपये मोजून लस घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नशीबी वाट पाहण्याची वेळ आली आहे. कॉर्पोरेट लसीकरणासाठी (corporate vaccination) एका डोसला हजार ते बाराशे रुपये खर्च करण्यात येत आहे. (In Mumbai comman man not getting vaccine but corporate vaccination in full speed)

देशात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. तासंतास रांग लावूनही नागरिकांना लसीचा डोस मिळत नाही, ऑनलाईन नोंदणी करुन महिना उलटून गेला तरी काहींना डोस मिळाला नाही. मात्र दुसरीकडे खासगी रुग्णालयात लसीची कमतरता नसल्याचे चित्र आहे. गेल्या शुक्रवारी मुंबईतील खासगी रुग्णालयांनी मिळून 25,683 जणांचे लसीकरण केले. तर, गुरुवारी 20,919 जणांचे लसीकरण झाले, याउलट शासकीय केंद्रांमध्ये शुक्रवारी 17,498 लोकांचे तर गुरुवारी 20,211 लोकांचे लसीकरण पार पडले.

Vaccination
Petrol price: न्यू यॉर्क पेक्षा मुंबईत दर दुप्पट

1 मे पासून केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून साठा घेण्याची परवानगी दिली. तेव्हा त्यांनी एकत्रितपणे 18 वर्षांवरील 1.48 लाख लोकांचे लसीकरण केले, याच काळात शासकीय लसीकरण मोहीमेत दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले गेले, या अंतर्गत 45 वरील वयोगटातील 5.55 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले.

Vaccination
मुंबई महापालिकेची नवी नियमावली जाहीर; वाचा काय आहेत बदल

लस उत्पादकांकडून खासगी रुग्णालयांना डोस पुरवण्याला सुरुवात झाली असतांना खासगी रुग्णालयात लसीकरणांची संख्या मागील आठवडाभरापासून वाढायला लागली आहे. आठवडाभरापुर्वी सर्व खासगी रुग्णालये मिळून एकत्रितपणे दिवसाला 5 ते सहा हजार लोकांना लसीचा डोज द्यायचे, 24 मेपर्यंत हा आकडा 10,000 आणि गुरुवारी 20 हजारावर पोहोचला.

ना नफा, ना तोटा तत्वावर लसीकरण करण्याचा दावा

बॉम्बे रुग्णालयाचे जनरल फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार,

खासगी रुग्णालय थेट लस उत्पादन कंपनीकडून लस खरेदी करत आहेत. कंपनी ज्या दरात लस रुग्णालयांना देत आहे , त्याच दरात बॉम्बे रुग्णालय लाभार्थ्यांना लस देत आहे. आम्ही कंपनीकडून 800 रुपयांना लस घेतली असून तोच दर आम्ही लाभार्थ्यांना लावतो. सध्या आम्ही 12 हजार लसीची मागणी कंपनीकडे नोंदवली आहे. मागणी असेल त्याप्रमाणे लसीकरण केले जाते. खासगी रुग्णालयात, कार्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. किंबहुना कॉर्पोरेट कार्यालये खासगी रुग्णालयांच्या मदतीनेच लसीकरण करू शकतात अस म्हटले तर ते योग्य ठरेल अस त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com