दुसऱ्या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचं ५०० कोटींचं नुकसान

समजून घ्या उल्हासनगर का महत्त्वाचं केंद्र आहे?
दुसऱ्या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचं ५०० कोटींचं नुकसान

कल्याण: उल्हासनगर (Ulhasnagar) हे महाराष्ट्रातील मुख्य उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. कोरोना व्हायरसच्या (corona virus) दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात लॉकडाउन (Maharashtra lockdown) लावण्यात आला. या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचे व्यवसायामध्ये तब्बल ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे (local traders) म्हणणे आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हा लॉकडाउन सुरु झाला. (In second Lockdown Ulhasnagar suffered Rs 500 cr loss)

दोन महिन्यांपासून बंद असलेले उत्पादन कारखाने, रिटेल आणि होलसेलची दुकाने आणि अन्य आस्थापने उघडण्याची परवानगी द्यावी, यासाठी व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ठाणे जिल्ह्यात येणारे उल्हाससनगर व्यवसाय आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. इथे फर्निचर मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, कपडा मार्केट आणि साडी मार्केट अशा महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.

दुसऱ्या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचं ५०० कोटींचं नुकसान
मुंबईत जूनमध्ये दुकानं उघडू शकतात पण...

बाजारपेठेशिवाय उल्हासनगर उत्पादनाचेही मुख्य केंद्र आहे. जीन्स, रेडीमेड कपडे, इलेक्ट्रीक वस्तु आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे निर्माण केले जाते. लॉकडाउन लागल्यापासून उल्हासनगरमध्ये ही सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. मालकच नाही, तर कर्मचारी आणि अन्य सर्व घटक जे व्यवसाय, व्यापाराशी संबंधित आहेत, त्यांच्या मिळकतीवर परिणाम झालाय, असं दीपक छटलानी यांनी सांगितलं. ते उल्हासनगर ट्रेड असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे.

दुसऱ्या लॉकडाउनमुळे उल्हासनगरचं ५०० कोटींचं नुकसान
मुंबईच्या 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण, संतप्त महापौरांची धडक

UTA चे १० हजार सदस्य असून ४५ संघटना आहेत. "मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसाऱ्यावरुन लोक खरेदीसाठी उल्हासनगरमध्ये येतात" असं छटलानी यांनी सांगितलं. फर्निचर मार्केटमध्ये ५०० पेक्षा जास्त दुकान आहेत. 'जीन्सच्या उत्पादनामध्ये आशियामध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आहोत' असा छटलानी यांनी दावा केला. साडी मार्केट असोशिएशनने मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र पत्र लिहून दिलासा देण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com