

उल्हासनगर -महानगरपालिकेच्या 15 लाख रुपयांच्या निधीतून उल्हासनगरात कुष्ठरोग पीडितांसाठी पहिलाच दवाखाना सुरू करण्यात आला आहे.त्यात कुष्ठरोग पीडितांची रोज मोफत मलमपट्टी आणि त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहे.
शहरात एकमेव कुष्ठरोग वसाहत ही कॅम्प नंबर 4 मधील वॉटर सप्लाय जवळील श्रीराम मंदिर कॉलनी मध्ये आहे.मात्र त्यांच्यासाठी दवाखाना नसल्याने मलमपट्टी,औषधोपचार करण्यासाठी त्यांच्यावर भटकंती करण्याची वेळ येत होती.
ही अवस्था पाहून नेताजी सुभाष कुष्ठ पीडित स्वावलंबन संघाचे अध्यक्ष कालप्पा हाडपद,सल्लागार प्रदीप गायकवाड,पदाधिकारी अब्दुल शेख,मोहन गुंडरेली,गोपाळ नायडू,गणेश भंकुर यांनी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून कुष्ठरोग पीडित वसाहतीत दवाखाना सुरू करण्याची मागणी केली होती.
महानगरपालिकेने दवाखाण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यावर आयुक्त विकास ढाकणे,अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण शेवकानी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी धर्मा यांच्या देखरेखीखाली दवाखान्याचे काम पुर्ण करण्यात आले.डॉक्टर वसंतराव नाईक, शहर अभियंता तरुण शेवकानी,सल्लागार प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.