ना वेळेत तपासणी, ना जेवण; 'या' शहरातील विलगीकरण कक्षाची दुर्दशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

शहरात एखादा कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील इतरांना खरबदारी म्हणून विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परंतु महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असलेल्या अनेकांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ठाणे : शहरात एखादा कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कातील इतरांना खरबदारी म्हणून विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परंतु महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत असलेल्या अनेकांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कक्षातील नागरिकांची वेळेवर तपासणी होत नाही, जेवायला देखील वेळेत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मोठी बातमी : नवी डोकेदुखी; राज्यात कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्याच रुग्णांची संख्या आहे...

घोडबंदर भागातील कासारवडवली आणि भाईंदर पाडा येथे शेकडो नागरीकांना आपल्या कुटुंबासह पालिकेने विलगीकरण कक्षात ठेवले आहे. काही नागरीकांना सोडण्यात आले आहे, तर काही नव्याने दाखल झाले आहेत. परंतु आता येथील नागरिकांचे हाल होत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात स्वच्छतेचा बोजवारा कसा उडाला आहे, हे दिसत आहे. तसेच दुपारी उशिरापर्यंत जेवणही मिळत नसल्याचे ते सांगत आहेत. तसेच आजारी पडलेल्यांची तपासणी देखील येथे केली जात नाही आणि येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याचा दावा त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. या संदर्भात संबधीतांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले आहे. 

हे ही वाचा : 'या' कारणाने उच्च न्यायालयाच्या यंदाच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आला आहे.  पालिकेने तात्काळ या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी देखील आम्ही केली आहे. -  सुहास देसाई, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस
 

 Inadequate facilities at Thane issolation center in corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inadequate facilities at Thane issolation center in corona