
अलिबाग : चार दिवसापूर्वी उद्घाटन झालेल्या जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्टमधून अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झालेला नाही. रुग्णालय प्रशासनाने घाईघाईने या प्लान्टचे उद्धाटन करुन घेण्यापुर्वी सबंधित यंत्रणेकडून पुरेशा तपासण्याच करुन घेतलेल्या नव्हत्या, त्यामुळे परवानग्या येईपर्यंत आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.
बाहेरुन ऑक्सिजनचे सिलेंडर आणण्यापेक्षा जिल्हारुग्णालयातील ऑक्सिजनची गरज या प्लान्टमधून भागवली जाणार आहे. परंतु इन्टॉलेशन प्रक्रिया पुर्ण न करताच याचा उद्धाटन समारंभ उरकून घेण्यात आला होता. प्लान्ट ते कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षतागृहा पर्यंतची पाईपलाईन देखील जोडण्यात आली नव्हती, त्याचबरोबर महत्वाची यंत्राणादेखील बसवण्यात आलेली नव्हती. केवळ ऑक्सिजनची टाकी घाईघाईत उभी करण्यात आली आहे. ही बाब अलिबागमधील सामाजिक कार्यकर्ते मुजफ्फर चौधरी यांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर सारवासारव करणारी उत्तरे देण्यात आली. ऑक्सिजन प्लान्टच्या सभोवताली संरक्षण कुंपणाचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे. कोव्हिड रुग्णालयातील ऑक्सिजन बेड पर्यंत जाणाऱ्या पाईपलाईनची जोडाजोड सुरु आहे. या सर्व प्रक्रियेत थोडा वेळ जाणार असून त्यानंतरच अंतिम परवानगी मिळेल असे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचे म्हणणे आहे.
सबंधित विभागाकडून प्लॅन्ट सुरु करण्याच्या परवानगी येत नाही तोपर्यंत या प्लान्टमधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकत नाही, असे डॉ. माने यांनी स्पष्ट केलेय. परवानगी नसताना घाईघाईत उद्धाटन करण्याची काय गरज होती, असा प्रश्न कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.
ऑक्सिजन प्लान्टसाठी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. येथील कोरोनारुग्णांसाठी या ऑक्सिजन प्लान्टची निर्मिती करणे आवश्यक होते. परंतु फायनल इन्टॉलेशन तपासणी झालेली नसल्याने थोडे दिवस वाट पहावी लागेल.
- अदिती तटकरे,
पालकमंत्री, रायगड
फायनल इन्टॉलेशन झालेले नसताना घाईघाईत उद्धाटन करुन घेण्याची काहीही गरज नव्हती. त्याचबरोबर कोव्हिड रुग्णालयात ज्या राखीव खाटांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे तेथे रुग्णांना ठेवले जात नाही. मग या खाटांचीही गरज काय?
- मुजफ्फर चौधरी,
सामाजिक कार्यकर्ते, अलिबाग
--------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.