डोंबिवलीत आम आदमी पार्टी सक्रीय; पालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयाचे उद्घाटन 

शर्मिला वाळुंज
Sunday, 3 January 2021

विविध निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची कार्यालये विविध प्रभागात नव्याने सुरू होत असतानाच आम आदमी पार्टीही कल्याण-डोंबिवलीत सक्रीय होत आहे.

डोंबिवली  ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुकीचा रणसंग्राम येत्या दोन-तीन महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाची कार्यालये विविध प्रभागात नव्याने सुरू होत असतानाच आम आदमी पार्टीही कल्याण-डोंबिवलीत सक्रीय होत आहे. डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे मध्यवर्ती कार्यालयाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक दोन तीन महिन्यात लागण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष कल्याण डोंबिवलीत सक्रीय झाले असताना आता दिल्लीतील सक्रीय पक्ष आम आदमी पार्टीही कल्याण डोंबिवलीत सक्रीय होऊ पाहत आहे. काही महिन्यांपूर्वीच कल्याण येथे आम आदमी पार्टीची बैठक पार पडली होती. त्यावेळी महापालिका निवडणूकांत सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नव्या वर्षात डोंबिवली मानपाडा चौकात रविवारी आम आदमी पार्टीने आपल्या मध्यवर्ती कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन केले. आम आदमी पार्टीचे सहसचिव रुबेन मस्करहन यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी ऍड. धनजंय जोखदंड, प्रविण पुरले, आकाश वेदक यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

तर महाराष्ट्रात का नाही? - 
दिल्लीत बदल होऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही?. 200 युनीट वीज बिल मोफत, 20 हजार लिटर पाणी बिल मोफत, शिक्षणाचा खर्च मोफत, रुग्णालय - शस्त्रक्रिया व औषधांचा खर्च मोफत, महिला व विद्यार्थी बस सेवा मोफत. हे जर दिल्लीत होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल आपकडून उपस्थित करण्यात आला आहे.याच मुद्‌यावर आप निवडणूकीचा प्रचार करणार आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी पालिकेत छाप पाडू शकते हे पहावे लागेल

Inauguration of Aam Aadmi Party office in Dombivali ahead of municipal elections

----------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Aam Aadmi Party office in Dombivali ahead of municipal elections