'वर्क फ्रॉम होम'च्या भत्यांवर आयकर विभागाची नजर; नोकरदारांसाठी दुष्काळात तेरावा महिना

'वर्क फ्रॉम होम'च्या भत्यांवर आयकर विभागाची नजर; नोकरदारांसाठी दुष्काळात तेरावा महिना
Updated on


मुंबई ः लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोकरदारांच्या अनेक भत्यांवर आता आयकर भरावा लागणार असल्याने त्यांना दुष्काळात तेरावा महिना सहन करावा लागणार आहे. एचआरए किंवा एलटीए सारखे भत्ते एरवी करमुक्त असतात, मात्र आता परिस्थिती बदलल्याने अशा भत्त्यांवर कर भरावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांवर हा जादा कराचा भार येऊ नये म्हणून काही कंपन्यांनी वेतनरचनेत बदल केला आहे, मात्र तरीही त्यामागील हेतू साध्य होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊमुळे वेतनकपात आणि दुसरीकडे जादा आयकर अशा कात्रीत अनेक कर्मचारी सापडले आहेत, असे सनदी लेखापाल (सीए) चिराग राऊत यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मिळणाऱ्या घरभाडेभत्यावर (एचआरए) एरवी आयकर लागू होतो. मात्र कर्मचारी भाड्याच्या घरात रहात असेल तर त्याला विशिष्ठ मर्यादेपर्यंत या भत्याची वजावट मिळते. पण आता टाळेबंदीमुळे कर्मचारी भाड्याचे घर सोडून आपल्या स्वतःच्या घरी गेला तर त्याला ही वजावट मिळणार नाही व त्याच्या संपूर्ण एचआरएवर आयकर लागेल. त्याचप्रमाणे बहुदा अजूनही वर्षभर फारसे कोणाला सुटीकालीन प्रवासभत्ता घेऊन (एलटीए) प्रवासाला जाता येणार नाही. त्यामुळे प्रवास केलाच नाही तर तो भत्ताही कर्मचाऱ्यांना मिळणार नाही, असेही राऊत यांनी दाखवून दिले. 

कन्व्हेअन्स अलाउन्सदेखील विशिष्ठ मर्यादेपर्यंत करमुक्त आहे. मात्र आता कर्मचारीच घरी असल्याने त्यावरही करसवलत मिळणार नाही. घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपन्या वर्क फ्रॉम होम अलाउन्स देतात, मात्र तो सरकारने यापूर्वीच करपात्र केला आहे. त्यातील जे प्रत्यक्ष खर्च असतील त्यांची वजावट घेता येते. खर्च नसतील व नुसताच भत्ता मिळत असेल तर तो करपात्र असतो, त्यावर सवलत नसते.

खरे पाहता यावर्षी सरकारने आणलेल्या नव्या कररचनेकडेच सर्व कर्मचारी वळत असून त्यात वरील करसवलीतीची क्लिष्टता राहिलीच नाही. केवळ गृहकर्ज असलेले किंवा घरभाडे भरणारे कर्मचारीच जुन्या कररचनेनुसार कर्जवजावट घेतात. मात्र आता ती संख्याही कमी होत असून बहुसंख्य कर्मचारी नव्या कररचनेकडे वळत आहेत, असेही राऊत यांनी दाखवून दिले.

--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com