Mumbai : आंबा फळपीक विमा योजनेच्या हप्त्यात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस आंबा

आंबा फळपीक विमा योजनेच्या हप्त्यात वाढ

तळा : कोकणात भातपिकाबरोबरच आंबा, काजू, नारळ, सुपारी, अशी पिके घेतली जातात. यावर्षी आंबा फळपीक विमा योजनेचा हप्ता दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवल्याने रायगडच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रायगडच्या पालकमंत्री तथा फलोत्पादन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

फळपीक विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलीयाज जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी आदींमार्फत राबवण्यात येते. यंदा सिंधुदुर्ग आंबा प्रति झाड ७० रुपये, रत्नागिरी १३३ रुपये, ठाणे २१७, तर रायगड २९४ रुपये हप्ता ठेवण्यात आला आहे. परंतु सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांपेक्षा रायगडमधील ही रक्कम सर्वांत जास्त आहे. या वर्षी जिल्ह्यातील आंबा, काजू फळपीक विमा योजनेचे काम भारतीय कृषी विमा कंपनीकडे दिले आहे. तरी रायगडचे खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्!यांनी केली आहे.

loading image
go to top