मुंबईकरांनो! सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, खासगी वाहनामुळे प्रदूषणात वाढ

मिलिंद तांबे
Thursday, 18 February 2021

 मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा वापर 80 टक्क्यांवरून 56 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.शहरातील प्रदूषण पातळीत ही वाढ झाल्याचे आवाज फाउंडेशनने म्हटले आहे.

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा वापर 80 टक्क्यांवरून 56 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 80 टक्के रस्ता खासगी वाहनांनी व्यापला असल्याचे समोर आले आहे. परिणामी शहरातील प्रदूषण पातळीत ही वाढ झाल्याचे आवाज फाउंडेशनने म्हटले आहे. 

देशात दररोज 40 किलोमीटरचा रस्ता बनवला जातो. तर रस्ते अपघातात प्रत्येक 5 मिनिटात एक मृत्यू होत आहे. यावर नियंत्रण आणण्याचे सोडून आपण अधिकाधिक रस्ते निर्माण करण्याच्या कामात गुंतलो आहोत.  मुंबईत कोस्टल रोड आपण तयार करत आहोत. यामुळे वाहनांची संख्या वाढणार असून प्रदूषणासह अपघातात वाढच होणार असल्याचे वाहतूक नियोजन तज्ज्ञ हुसेन इंदूरेवाला यांनी म्हटले आहे. 

प्रत्येक 10 वर्षात खासगी वाहनांची संख्या दुपटीने वाढत आहे. मुंबईत आज 50 लाखांहून अधिक वाहने धावत आहेत. मुंबईत सार्वजनिक वाहतुकीने केवळ 1.1 टक्के रस्ता व्यापला आहे. सार्वजनिक वाहतूक हे कमी वेळात अधिकाधिक प्रवाशांची वाहतूक करत असून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामुळेच खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. तसेच वाहतूक कोंडीचा सामना सामना करावा लागतो. प्रदूषण वाढल्याचे ही दिसत असल्याचे इंदूरेवाला यांनी सांगितले. मुंबईत बससाठी वेगळी मार्गिका असावी. यामुळे बसची कार्यक्षमता वाढणार असून यामुळे प्रदूषण ही कमी होईल असे ही त्यांनी पुढे सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत महागड्या खासगी वाहनांवर अधिक पैसा खर्च केला जात आहे. गेल्या 20 वर्षात कोस्टल रोडवर दरडोई 22 रूपये, मेट्रोवर 88 पैसे तर बस मार्गिकेवर केवळ 18 पैसे खर्च केले आहेत. सार्वजनिक वाहतुकीवर आपण अधिकाधिक भर देऊन खासगी वाहतुकीचा वापर कमी करायला हवा, मात्र यासाठी आपल्याला सक्षम सार्वजनिक वाहतूक उभी करावी लागेल. 

ध्वनी प्रदूषण ही देखील गंभीर समस्याच बनली आहे. मात्र त्याचे मापदंड सांगणे कठीण असल्याचे डॉ अल्ताफ पटेल यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 8 तासात जर का 185 डेसीबल पेक्षा अधिक आवाज असेल तर ध्वनी प्रदूषण असल्याचे सांगितले जाते. मात्र अर्क वाहनांच्या हॉर्नचा आवाज 107 ते 109 डेसीबल असल्याचे ही यांनी सांगितले. यामुळे ध्वनी प्रदूषणाला आला कसा घालणार असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. 

ध्वनी प्रदूषणामुळे 6 ते 19 वयोगटातील 12.5 टक्के मुलांना ऐकण्याची समस्या होत असल्याचे ही डॉ पटेल यांनी पुढे सांगितले. 30 डेसीबलचा आवाज असला तरी झोपेच्या समस्या उद्भवत असल्याचे ही पटेल यांनी पुढे सांगितले. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून आरोग्याचे प्रश्न ही निर्माण होत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक ताण वाढत असून उच्च रक्तदाब तसेच हृदयविकाराचे प्रमाण ही वाढले आहे. 

हेही वाचा- ''मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी किती वर्षे वसुली सुरू राहणार''

सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे, हवा तसेच ध्वनी प्रदूषण कमी करणे महत्वाचे आहे. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असून अभ्यासक्रमात याचा समावेश करणे गरजेचे असल्याचे आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुलअली यांनी सांगितले.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increase in pollution levels city of Mumbai Public transport use decreased


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in pollution levels city of Mumbai Public transport use decreased