आवक घटल्याने कोथिंबिरीच्या भावात वाढ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात कोथिंबीरचे दर वाढले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कोथिंबीर 3 ते 5 रुपयांपर्यंत जुडी उपलब्ध होती. ती सध्या 15 रुपये जुडी विकली जात आहे.

नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात कोथिंबीरचे दर वाढले आहेत. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कोथिंबीर 3 ते 5 रुपयांपर्यंत जुडी उपलब्ध होती. ती सध्या 15 रुपये जुडी विकली जात आहे.  परिणामी, किरकोळ बाजारातदेखील कोथिंबीर जुडीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. 

ही बातमी वाचली का? संशयित करोना रुग्णांची दोनवेळा तपासणी

अन्नाचा स्वाद वाढविण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीपासून वड्या हा लोकप्रिय खाद्यपदार्थ देखील बनवला जातो. त्यामुळे कोथिंबिरीचे स्वयंपाकघरात फार महत्त्व आहे. भाजीत, वरणात कोथिंबार टाकल्यास अन्नपदार्थ सुंदरही दिसतात. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कोथिंबीर 3 ते 5 रुपयांपर्यंत जुडी उपलब्ध होती. कोथिंबिरीची आवकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने दर आटोक्‍यात होते. मात्र, कोथिंबिरीला भाव चांगले मिळत नसल्याने शेतकऱ्यांना परवडत नव्हते. म्हणून त्यांनी या आठवड्यात आवक बंद केली. त्यामुळे पुणे भागातून येणारी कोथिंबिरीची आवक बंद झाली आहे. 

ही बातमी वाचली का? सायन-दादर प्रवासासाठी ६ हजार रुपये!

सध्या बाजारात येणारी कोथिंबीर नाशिक भागातून येते. त्यामुळे पर्यायच नसल्याने नाशिक मालाची चलती आहे. घाऊक बाजारात कोथिंबीर 15 रुपये जुडी विकली जात आहे. किरकोळ बाजारात कोथिंबीर जुडीचे दर 20 रुपये आहेत. नाशिकहून जवळपास 15 टेम्पो कोथिंबिरीची आवक होत आहे. 
- आनंद कदम, व्यापारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The increase in the prices of Corianders is due to the decline in arrivals