esakal | तरूणांमध्ये वाढतोय टाईप-2 मधुमेह, प्रजनन क्षमतेची समस्या उद्भवण्याचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

तरूणांमध्ये वाढतोय टाईप-2 मधुमेह, प्रजनन क्षमतेची समस्या उद्भवण्याचा धोका

चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरूणांमध्ये टाईप-2 मधुमेही रूग्णांची संख्या वाढतेय. यात 20 ते 40 वयोगटातील तरूणांची संख्या सर्वांधिक आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर विविध आजारांना आमंत्रण मिळते.

तरूणांमध्ये वाढतोय टाईप-2 मधुमेह, प्रजनन क्षमतेची समस्या उद्भवण्याचा धोका

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबईः  चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरूणांमध्ये टाईप-2 मधुमेही रूग्णांची संख्या वाढतेय. यात 20 ते 40 वयोगटातील तरूणांची संख्या सर्वांधिक आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर विविध आजारांना आमंत्रण मिळते त्यामुळे लैंगिक समस्या उद्भवू शकतात. रूग्णांमध्ये प्रजनन क्षमतेशी संबंधित विकार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मधुमेह हा आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मधुमेह हा आजार एक 'साइलेंट किलर' आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचं काम इन्सुलिन करते. मात्र पोटातील अन्नाशयात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेह होतो. याशिवाय रोजच्या जीवनातील ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होऊ शकतो. तसेच अनुवांशिकता आणि स्थूलता या कारणांमुळेही मधुमेह होतो. वारंवार लघवीला आल्यासारखे वाटणे, तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टी कमजोर होणे, थकवा जाणवणे, मळमळ, उलटी येणं अशी लक्षणे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये दिसून येतात.

गरोदरपणा आणि बाळंतपण हा महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. हार्मोनल बदल, अस्वस्थता आणि वेदना या सर्व अवघड प्रवासातून महिलांना जावे लागते. अशा स्थितीत बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होऊन आरोग्याची समस्या उद्भवून गरोदरपणात मधुमेह. गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी, प्लेसेंटाद्वारे लपविलेले ची समस्या उद्भवू शकते. अशावेळी गरोदर महिलांच्या शरीरातील रक्तात साखरेची पातळी वाढते. या स्थितीत गरोदरपणात मधुमेहाची लागण होते असे स्टेम आरएक्स रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितले.

अधिक वाचाः  नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करा, माथेरान नगराध्यक्षांची मागणी

ही समस्या सर्व गर्भवती महिलांमध्ये होत नाही. सामान्यत: ज्या गरोदर महिलांच्या शरीरात अतिरिक्त इंसुलिन तयार होत नाही त्या महिलांना गरोदरपणात ही समस्या उद्भवते. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह आणि कौटुंबिक इतिहास यामुळे गर्भधारणेदरम्यान जीडीएम होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान महिलांनी नियमित आरोग्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे असल्याचे डॉ. प्रदिप महाजन पुढे म्हणाले.

बाळाच्या जन्मानंतर महिलांमधील हा आजार कमी होतो. गर्भधारणेदरम्यान त्वरित उपचाराने बर्‍याच प्रकरणांमध्ये महिलांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. जीडीएम या समस्येवर सेली थेरपी फायदेशीर ठरत आहे. या थेरपीमुळे रोगप्रतिकारक यंत्रणा नियमित केली जाते. शिवाय स्वादुपिंडाच्या पेशींचे कार्यही वाढविले जाते, परिणामी इंसुलिनचा चांगला वापर होतो. पेशी अधिक चांगल्याप्रकारे कार्य करण्यासाठी जीवनशैली आणि आहारातील बदल आवश्यक आहेत, असेही डॉ प्रदिप महाजन म्हणाले.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Increasing type 2 diabetes in young people risk of developing fertility problems

loading image