बेस्ट कर्मचाऱ्यांना पगारवाढ; 10 हजारांपर्यंत वाढणार पगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

सातवा वेतन आयोगानुसार आज बेस्ट प्रशासनासोबत बेस्ट कामगार सेनेने करार केला. हा करार 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी केला आहे.

मुंबई : सातवा वेतन आयोगानुसार आज बेस्ट प्रशासनासोबत बेस्ट कामगार सेनेने करार केला. हा करार 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीसाठी केला आहे. या करारानुसार कामगारांना 17 टक्के वेतनवाढ होणार असल्याची माहिती बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी दिली. 

या करारापोटी 1150 कोटी रुपये इतका आर्थिक बोजा बेस्ट उपक्रमावर पडला आहे. या करारामुळे कामगारांना किमान 5 हजार ते कमाल 10 हजार रुपये वेतनवाढ मिळू शकेल. तसेच पालिकेच्या कामगारांइतकेच बेस्टच्या कामगारांना सानुग्रह अनुदान मिळेल, अशी माहिती सामंत यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increment to BEST employees salary will increased up to 10 Thousand