इंडेन एलपीजी कनेक्शन एका Miss Call वर; इंडियन ऑइलची सुविधा

डिजिटल इंडिया या योजनेनुसार ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे
indane gas
indane gas sakal

मुंबई : ज्या ग्राहकांना नवे इंडेन एलपीजी गॅस (indane gas) कनेक्शन हवे असेल त्यांनी फक्त 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याची सुविधा इंडियन ऑईल (indian oil) कडून देशभरात सुरु करण्यात आली आहे. तर सध्याच्या ग्राहकांना आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून येथे मिस्ड कॉल देऊन गॅस सिलेंडरची मागणी नोंदविता येईल. (indane lpg gas connection a miss call indian oil facility)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या योजनेनुसार ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असे इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस एम वैद्य यांनी सांगितले. ग्राहकांना एलपीजीचा रिफिल सिंलेडर मागवण्यासाठी किंवा एलपीजी सिलेंडरच्या किमतीचा भरणा करण्यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम, इंडियन ऑइल वन अॅप किंवा https://cx.indianoil.in या पोर्टलचा वापर करता येईल.

एलपीजी रिफिल सिलेंडरची मागणी नोंदवणे तसेच रिफिलसाठी किमतीचा भरणा करणे या दोन्ही गोष्टी 7588888824 या नंबर वरून व्हॉट्सअप करुन किंवा 7718955555 या नंबरवर एसएमएस /आयव्हीआरएस माध्यमातून होतील. याशिवाय ॲमेझॉनचे अलेक्सा किंवा पेटीएम चॅनेल्सवरूनदेखील ही कामे करता येतील. वापरास सुलभ असणारी मिस्ड कॉल सुविधा ग्राहकांचा वेळ वाचवेल. तसेच नवीन ग्राहकांना जोडणीसाठी असलेली मिस्डकॉलची सुविधा ही सोपी व विनाखर्चाची असल्याने ग्राहकांना विशेषतः वरिष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी ती जास्त उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा अध्यक्षांनी व्यक्त केली.

indane gas
Lalbaugcha Raja 2021 : लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

डबल बॉटल कनेक्शन ही आणखी एक सुविधा ग्राहकांना घरपोच देण्याच्या उपक्रमाचेही एस एम वैद्य यांनी या वेळी उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत सिलेंडर देणारा कर्मचारी, सध्याचे एक सिलेंडर हे डबल बॉटल कनेक्शन म्हणजे दोन सिलेंडर मध्ये परावर्तित करण्याची सुविधा घरपोच देऊ शकेल. यामध्ये सामान्यतः 14.2 किलोग्रॅम एवढ्या सिलेंडर बरोबर पाच किलोग्रामचा सिलेंडर मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com