१५ ऑगस्टपासून धावणार डेक्कन क्वीन ; प्रवाशांसाठी आकर्षक विस्टाडोम कोच

deccan queen express
deccan queen expresssakal media

मुंबई : मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई-पुणे मार्गावर (mumbai-pune way) डेक्कन एक्स्प्रेसनंतर मुंबई-पुणे डेक्कन क्वीनला (deccan queen) विस्टाडोम कोच लावले आहेत. 15 ऑगस्ट (independence day) रोजी ही गाडी धावणार असून प्रवाशांना विस्टाडोममधून (vistadome coach)फिरण्याचा आनंद मिळणार आहे. तर, या डेक्कन क्वीनचे विस्टाडोम कोच माटुंगा कारशेडमध्ये सज्ज झाले आहेत. विस्टाडोम कोच डबे आकर्षक आणि देखणे दिसून येत आहेत.

गाडी क्रमांक 02123/02124 सीएसएमटी - पुणे - सीएसएमटी डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनला 15 ऑगस्टपासून एक विस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर जोडण्यात आलेला दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. या मार्गावर पहिल्यांदा गाडी क्रमांक 01007/01008 सीएसएमटी - पुणे - सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्ये 26 जुलै रोजीपासून विस्टाडोम कोच जोडण्यात आला. या मार्गावरील प्रवाशांची विस्टाडोम कोचची मागणी वाढल्याने डेक्कन एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येत आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

deccan queen express
निर्देशांक वधारले! निफ्टी ८२ अंशांनी वाढला, तर सेन्सेक्स ५५ हजारांजवळ

आयसीएफ बनावटीचे कोच माटुंगा कारशेडमध्ये अत्यावश्यक बदल करून डेक्कन क्वीनला जोडण्यात येणार आहेत. डेक्कन क्वीनचे करडा, निळसर, जांभळ्या रंगाचे डबे, मोठ-मोठ्या खिडक्या, दरवाज्याला गोलाकार खिडकी, डब्याच्या दर्शनी भागावर सीएसएमटी इमारतीचे चित्र दर्शविण्यात आले आहे . गाडी क्रमांक 02124 पुण्याहून सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि सकाळी 10.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. गाडी क्रमांक 02123 सीएसएमटीहून सायंकाळी 5.10 वाजता सुटेल आणि सायंकाळी 8.25 वाजता पुण्याला पोहोचेल. एक व्हिस्टाडोम कोच, 4 वातानुकूलित चेअर कार, 9 सामान्य द्वितीय आसन श्रेणी, 2 द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 पॅन्ट्री कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com