kisan railway
kisan railwaysakal media

एका वर्षातच किसान रेल्वेच्या मध्य रेल्वेवरून 500 फेऱ्या पूर्ण

Published on

मुंबई : भाजीपाला, फळे, फुले, दूध, मांस आणि मासे अशा नाशवंत वस्तूंचा पुरवठा देशभरात वेगाने होण्यासाठी भारतीय रेल्व मार्गावर (indain railway ) किसान रेल्वे चालविण्यात (kisaan railway) येत आहे. सर्वात पहिली किसान रेल्वे 9first kisaan railway) ऑगस्ट 2020 रोजी मध्य रेल्वेवरून (central railway) देवळाली ते मुझफ्फरपूर या दरम्यान धावली. तर, एका वर्षात म्हणजे 12 ऑगस्ट 2021 रोजी मध्य रेल्वेवरून सांगोला (sangola) येथून मुझफ्फरपूरकडे 500 वी किसान रेल्वे रवाना झाली.

मध्य रेल्वेवरून पहिली किसान रेल्वे देवळाली ते दानापूर पर्यंत सुरू झाली आणि लोकांच्या मागणीनुसार ती मुजफ्फरपूर पर्यंत वाढवली गेली. 7 ऑगस्ट 2020 रोजी ही रेल्वे धावली. त्यानंतर 28 डिसेंबर 2020 रोजी 100 वी किसान रेल्वेची फेरी चालविण्यात आली. महाराष्ट्राचे डाळिंब देवळाली- मुजफ्फरपूर किसान रेल्वेला जोडलेल्या सांगोला -मनमाड लिंक किसान रेल्वेद्वारे दूरच्या बाजारपेठांमध्ये पोहोचले.

kisan railway
म्हाडाच्या भूखंडाचे GPS मॅपिंग ; लवकरच निविदा मागविणार

नागपुरातील संत्री दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये लवकर आणि फ्रेश पोहोचले. सरकारने 'ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल' या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत सरकारच्या व्हिजनचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना 50% सबसिडी देखील वाढवली आहे. यामुळे रेल्वे, शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी पहिली पसंती बनली आहे. मध्य रेल्वे सध्या देवळाली -मुजफ्फरपूर, सांगोला-आदर्श नगर दिल्ली, सांगोला- शालीमार, रावेर- आदर्श नगर दिल्ली आणि सावदा-आदर्श नगर दिल्ली या ५ किसान रेल चालवत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. 12 ऑगस्ट 2021 पर्यंत किसान रेल्वेच्या 500 फेऱ्यांच्याद्वारे 1.69 लाख टन फळे आणि भाज्यांची वाहतूक करण्यात आलेल्या अनोख्या कामगिरीच्या प्रयत्नांचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com