Mumbai Rain Alert: पावसाच्या फटक्यानंतर विस्कळीत झालेली लोकल सेवा हळूहळू रुळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local train services hit due heavy rainfall

Mumbai Rain Alert: पावसाच्या फटक्यानंतर विस्कळीत झालेली लोकल सेवा हळूहळू रुळावर

Mumbai Rains Local Train Update : मुंबई -उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतूकीला मोठा फटका बसला आहे. मध्य,हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पावसामुळे संथ गतीने धावत आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम पडलेला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला. सीएसएमटी - कुर्ला- ठाणे विभागात पावसाने पहाटे पासून जोर पकडला आहे. मात्र,तरी ही मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर/नेरूळ - खारकोपर विभागामध्ये लोकल सेवा संथ गतीने धावत आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवांना लेटमार्क लागला आहे.

मध्य रेल्वेची लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक मंदावली असून, याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

प्रवाशांना लेटमार्क-

सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार बॅटींग केल्यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील वाहतुकीचे विलंबाने धावत आहे. तसेच मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेळापत्रकावर सुद्धा परिणाम झालेला आहे.मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने खबरदारी म्हणून लोकल सेवा धीम्या गतीने धावत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्क लागलेला आहे.

Web Title: Indian Railways Update Mumbai Local Train Services Hit Due Heavy Rainfall Mumbai Rains

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top