इमारतींच्या पुनर्निर्माणाचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राज्य सरकारचे सकारात्मक आश्वासन

उल्हासनगर : अनेक वर्षांपूर्वी येथे उभारण्यात आलेल्या शेकडो इमारती धोकादायक झाल्या असून या इमारतींचे स्लॅब कोसळू लागल्याने इमारती रिकाम्या करण्यात येत आहेत. अशा इमारतींचे पुनर्निर्माण करण्यास अनुमती मिळावी, एफएसआय मिळावा, अशी मागणी भाजपच्या प्रवक्‍त्या श्वेता शालिनी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी नगरविकास सचिव नितीन करीर यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत करीर यांनी सकारात्मक आश्‍वासन दिले आहे.

विषय कॅबिनेटमध्ये मांडण्यासाठी प्रयत्नशील
बेघर झालेल्या रहिवाशांच्या शिष्टमंडळाने डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या. तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा संवेदनशील विषय मांडून कॅबिनेटमध्ये मांडण्याची विनंती करणार असे आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indications for the redevelopment of buildings