माथेरानमधील पॉइंट "बोलके'

अजय कदम
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

माथेरानमध्ये येणारे पर्यटक डोंगराच्या टोकावर म्हणजे "पॉइंट'ला हमखास भेट देतात, परंतु त्या ठिकाणी माहिती फलक नसल्याने नक्की काय पाहायचे या संभ्रमात पर्यटक असतात. हे ठिकाण किती धोकादायक आहे, ही माहितीही त्यांना नसते. त्यामुळे पर्यटक गोंधळून जातात. माथेरान वन विभाग आणि वन व्यवस्थापन समितीने यासंदर्भात पुढाकार घेत सर्व "पॉइंट'वर माहिती फलक लावले आहेत. ते पर्यावरण पूरक आहेत. 

माथेरान : थंड हवा, घनदाट जंगल, नानाविविध पशू-पक्षी असलेले माथेरान राज्यातील लाखो पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे या गावात सर्वच हंगामात मोठी गर्दी असते, परंतु तब्बल 10 वर्षे "पॉइंटस्‌'वर महितीफलक नसल्यामुळे "गाईड'च्या माहितीवर पर्यटकांना अवलंबून राहावे लागत होते. आता वन विभागाने ही चूक सुधारत प्रत्येक "पॉइंट'वर नाव, त्याचे वैशिष्ट्य, जंगलात आढळणारे प्राणी अशा स्वरूपातील माहिती फलकावर दिली आहे. 

माथेरानमध्ये येणारे पर्यटक डोंगराच्या टोकावर म्हणजे "पॉइंट'ला हमखास भेट देतात, परंतु त्या ठिकाणी माहिती फलक नसल्याने नक्की काय पाहायचे या संभ्रमात पर्यटक असतात. हे ठिकाण किती धोकादायक आहे, ही माहितीही त्यांना नसते. त्यामुळे पर्यटक गोंधळून जातात. माथेरान वन विभाग आणि वन व्यवस्थापन समितीने यासंदर्भात पुढाकार घेत सर्व "पॉइंट'वर माहिती फलक लावले आहेत. ते पर्यावरण पूरक आहेत. 

माथेरानमधील पॉइंटवर माहिती फलक नसल्यामुळे पर्यटक गोंधळून जात होते. पर्यटकांनी याकडे लक्ष वेधले होते, पण निधीअभावी हे काम थांबले होते. आता वन व्यवस्थापन समितीने माहिती फलक लावण्याचे ठरवले आहे. त्यानुसार फलक उभे करण्यात येत आहेत. 
- योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती 

वन व्यवस्थापन समिती माथेरानमधील आलेल्या वाहनांची कर स्वरूपात ठराविक रक्कम घेते. त्या करातून आलेल्या रकमेतून माथेरानमधील पॉइंटचे सुशोभीकरण सुरू करण्यात येत आहे. पॉइंटवर महितीफलकही लावण्यास सुरुवात झाली आहे. 
- नारायण राठोड, वनक्षेत्रपाल, वन विभाग माथेरान 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information panels are being installed in Matheran