हजारो शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये घोटाळा ? चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी

सामाजिक कार्यकर्त्यांसोबत शिक्षण तज्ज्ञांनी घेतली आयुक्तांची भेट
meeting with vishal solanki
meeting with vishal solankisakal media

मुंबई : टीईटी परीक्षेतील घोटाळ्यासाठी (TET exam scam) शालेय शिक्षण विभागातील (School education department) गैरकारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच आता २०१२ पासून शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या (teachers appointment scam) करण्यात आलेल्या नियुक्त्यांतील घोटाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षण तज्ज्ञांनी (Education Experts) या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची (teachers recruitment scam) चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधिशांमार्फत चौकशी आयोग (inquiry commission) स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यासाठी आज शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी (vishal solanki) यांची भेट घेऊन त्यासाठीचे निवेदन देत यावर कार्यवाही करण्याचा आग्रह धरला. (Inquiry commission through judges demand for thousands of teachers appointment scam)

meeting with vishal solanki
वर्सोवा खाडीवरील वाहतूक कोंडी फुटणार?

या शिष्टमंडळात शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी वकिल असीम सरोदे,आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, सिस्‍कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, कार्यकर्ते संजय दाभाडे, वैशाली बाफना,सुरेश साबळे,प्रकाश टेके, विद्यानंद नायक, सतीश यादव व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यातील शेकडो अनुदानित शाळांमध्ये २०१२ नंतर शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यासाठी संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या संगनमताने शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा झाला असून त्यावर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात अनेकदा चर्चा झाल्यांनतर त्यासाठीचा अहवाल बनला मात्र त्यावर कोणतीही अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे हा घोटाळा खूप गंभीर असल्याने याची चौकशी करण्यासाठी आयोगाची गरज असून २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज आहे याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून समाजासमोर वास्तव मांडावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

meeting with vishal solanki
मंगलप्रभात लोढा यांचे सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र, म्हणाले...

शासनाची कोट्यवधींची फसवणूक

टीईटी परीक्षा पास करण्याचेही पैसे व त्यातून सुटका करून नेमणूक देण्याचेही पैसे असे दुहेरी भ्रष्टाचार राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात घडली, त्यामुळे त्यांची व्याप्ती राज्यभरात आहे. २०१२पूर्वी शिक्षकांच्या नेमणुका दाखवून खोटे रेकॉर्ड कसे तयार केले या तपशिलासह या शिक्षकांचे पगार आणि पगारातील फरकसुद्धा काढून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढा

विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करत असताना त्यांची नेमणूक अनुदानित तुकड्यांवर करण्याऐवजी पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. अल्पसंख्यांक शाळांमधील भरती ही अशाच प्रकारची संशयास्पद आहे हे सारे बघता आता राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com