
मुंबई : भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या घराचं बांधकाम अनधिकृत असल्याचा संशय व्यक्त करत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून साडेतीन तास कसून तपासणी करण्यात आली. इमारतीची सद्यस्थिती आणि पूर्वीचा आराखडा तपासून कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिलं जाईल, असं कंबोज यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. (Inspection of unauthorized construction of Mohit Kamboj by BMC officials)
कंबोज म्हणाले, मी महाविकास आघाडीच्या सरकारला धन्यवाद देतो की, कोविडनंतर आमच्या बिल्डिंगची स्वच्छता झाली नव्हती चांगल्याप्रकारे तर महापालिकेचे अधिकारी घरी येणार असल्यानं इमारतीच्या पायऱ्यांपासून सर्व गोष्टींची चांगली स्वच्छता झालेली आहे. पण बदल्याच्या भावनेतून ज्या प्रकारे हे सरकार भाजपच्या लोकांवर कारवाई करत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. महिन्याभरापासून आपण पाहत आहोत की, नारायण राणे, आशिष शेलार त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्यावर ज्या प्रकारे कारवाई होत आहे. तसेच आता माझ्यावर पोलिसांमध्ये कुठलाही गुन्हा दाखल नसल्यानं आता मुंबई महापालिकेमार्फत माझ्या कार्यालयावर आणि मालमत्तेवर कारवाईचा प्रयत्न सरकारनं केला. महापालिकेनं आम्हाला अनेक समन्स आणि नोटीस पाठवल्या या सर्वांची आम्ही तपासणी केली. यावर सर्व अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये गैरप्रकारे जर काही बांधकाम झालं तर ते पुढील कारवाई करणार आहेत. त्याला मी नंतर उत्तर देईन"
आम्ही या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. त्यांच्याजवळ कुठलीही बेकायदा बांधकामाची माहिती नव्हती. केवळ कलम ४८८ अंतर्गत पालिकेच्या आयुक्तांना कुठल्याही ठिकाणची घरात जाऊन तपासणी करण्याचा अधिकार मिळतो. यासाठी चोवीस तासात नोटीस देऊन कारवाई करता येते. हा कलम ४८८ चा दुरुपयोग आहे, कारण कोणताही पुरावा नसताना अशी कारवाई करणं चुकीचं आहे.
माझ्या घरात कुठलंही चुकीचं बांधकाम झालेलं नाही, त्यामुळं केवळ बदल्याच्या भावनेनं ही तपासणी करण्यात आली. माझ्या घरात दोन लहान मुलं आणि वयस्कर आई-वडील असताना देखील त्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळं पालिकेनं जोर लावून मला धमकावणं आणि माझ्या कुटुंबियांना घाबरवणं याद्वारे माझा आवाज बंद होईल असं जर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना वाटत असेल तर त्यांना सांगतो की, तुमचा भ्रष्टाचार उघड करण्याचं आमचं काम अधिक वेगानं सुरु राहिल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.