
Mumbai News : 'सिंघम' सारखी झटपट न्याय देणारी प्रतिमा पोलिसासाठी धोकादायक - न्यायाधीश पटेल
मुंबई : “सिंघम” सारख्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कायद्याच्या प्रक्रियेची तमा न बाळगता जलद न्याय देणार्या “हीरो कॉप” ची प्रतिमा अत्यंत घातक संदेश देत असल्याचे गंभीर मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.
शुक्रवारी भारतीय पोलीस फाउंडेशनने पोलीस सुधारणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती पटेल यांनी कायद्याच्या प्रक्रियेबद्दल नागरिकांच्या "उतावळ्या मानसिकतेवर" प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पोलीस सुधारणांबद्दल बोलताना, न्यायाधीश पटेल म्हणाले आपण स्वतःमध्ये सुधारणा केल्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुधारू शकत नाही. पोलिसांची "गुंड, भ्रष्ट आणि बेजबाबदार" अशी प्रतिमा चित्रपटात लोकप्रिय आहे .
परंतु अशाप्रकारे न्यायाधीश, राजकारणी आणि पत्रकारांसह सार्वजनिक जीवनातील कोणावरही आरोप करता येतील.असे आरोप टाळण्याचा संदेश न्यायाधीश गौतम पटेल यांनी दिला. कायद्याची अमलबजावणी न करता झटपट न्याय देण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे न्यायधीश पटेल म्हंटले.