नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत महिनाभरात सरासरी आठ हजार ते साडेआठ हजार नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.
पनवेल : कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत पीडित व्यक्तीला नेहमीच मदतीची गरज भासत असते. हे लक्षात घेऊन ११२ ही आपत्कालीन हेल्पलाइन सुविधा (Emergency Helpline Facility) सुरू करण्यात आली. त्यावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीला तत्काळ मदत पोचविण्यासाठी नवी मुंबई पोलिस (Navi Mumbai Police) तत्पर आहेत. ‘तुमची सुरक्षा, आमची जबाबदारी’ हे ध्येय मानून नवी मुंबई पोलिस दल सतर्क आणि कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.