esakal | शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ST बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ST बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना

राज्य सरकारने 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात गावातून शहरापर्यंत एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. 

शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ST बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : राज्य सरकारने 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात गावातून शहरापर्यंत एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बस पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. 

राज्य सरकारने 18 जानेवारीपासून शाळांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरातील शाळांत एसटीने प्रवास करतात. त्यामुळे शालेय पासची मोठ्या प्रमाणावर मागणी होणार असल्याने एसटी महामंडळानेसुद्धा आपली तयारी सुरू केली आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यासाठी एसटीच्या आगर व्यवस्थापकांच्या अखत्यारीत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पासेसची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे. शिवाय शालेय संस्थेत जाऊन पासेस वितरित करण्यात यावेत. शिवाय पूर्वी चालनात असलेल्या सर्व शालेय फेऱ्या सुरू करण्यात याव्यात. नव्याने फेऱ्या सुरू करण्याची आवश्‍यकता असल्यास तत्काळ शालेय फेरी सुरू करण्याचे आदेशसुद्धा एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिली आहे. 
Instructions to start ST bus pass facility for school students in mumbai

---------------------------------------------

( संपादन -  तुषार सोनवणे )

loading image