माथाडी कामगार, सुरक्षा रक्षकांना 50 लाखांचे विमा संरक्षण

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 July 2020

कामगार विभागांतर्गत नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात येणार आहे. तसेच, कोरोना संसर्गाच्या काळात त्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जाहीर करण्याचा निर्णयही आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई  : कामगार विभागांतर्गत नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात येणार आहे. तसेच, कोरोना संसर्गाच्या काळात त्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जाहीर करण्याचा निर्णयही आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

इथली पावभाजी तुम्ही खाल्लीच असेल ! मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी दुकानातून 100 किलो बटर आणि चीज चोरीला...

 निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या संदर्भात आज झालेल्या बैठकिला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोनासह मानसिक आजारांमध्ये वाढ; आर्थिक संकटामुळे अनेकजणांचा व्यसनांकडे वाढतोय कल

राज्यात एकूण 15 सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षा रक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हील हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत.

राज्यात 1 लाखाहून अधिक माथाडी कामगार
सध्या राज्यात नोंदणीकृत माथाडी कामगारांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे. तर, शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी 28 हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत.

Insurance cover of Rs 50 lakh to Mathadi workers, security guards

( संपादन ः रोशन मोरे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurance cover of Rs 50 lakh to Mathadi workers, security guards