मुंबई : विमा कंपनीचे एजंट बनून 19 लाखांंची लूट; पाच आरोपींना अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprits arrested

मुंबई : विमा कंपनीचे एजंट बनून 19 लाखांंची लूट; पाच आरोपींना अटक

मुंबई : विमा पॉलिसीत (insurance policy) जास्त परतावा आणि पॉलिसीवर बीनव्याज कर्ज (without interest loan) देण्याच्या अमिशानं वेगवेगळ्या विमा कंपन्यांचे एजंट (insurance company agent) बनून 19 लाखाला लुटण्याचा प्रकार मुंबईमध्ये (Mumbai) समोर आलाय. सहा आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक (Six culprit arrested) करण्यात आलीय.

हेही वाचा: वसई-विरार तहानलेलाच; पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे हाल

बानी सिंग आणि विजय मेहता यांनी भारती अक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनीकडून आलोय, तर दिपक दुबे, स्नेहा आणि पुजा यांनी आपण पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स कंपनीच्या विमा एजंट असल्याचं सांगून जास्त परताव्याच्या विमा पॉलिसी देतो असं सांगत तक्रारदाराला जून 2020 ते मार्च 2021 या कालावधीत काही पॉलीसी विकल्या. या पॉलिसीची विक्री ऑनलाईन करण्यात आली. त्यानंचर तक्रारदाराला bhartiaxa@aol.com या मेलवरुन पॉलिसी प्रमाणपत्रही पाठवण्यात आलं.

त्यानंतर तक्रारदारानं घेतलेल्या पॉलिसीचा कंपनीला फायदा झाल्यानं कंपनी त्यांना 72 लाख आणि 12 लाख बीनव्याजी कर्ज आणि पेन्शन मिळणार असल्याचं अमिष दाखवलं, आणि त्यासाठी 19 लाख रुपये भरण्यासाठी तक्रारदाराला कनव्हींस केलं, त्यानुसार त्यांनी 19 लाख आरोपींच्या वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर केले. त्यानंतर आरोपींशी काहीही संपर्क झाला नाही, तेव्हा तक्रारदारानं सायबर पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला तेव्हा गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले सिमकार्ड हे उत्तर प्रदेशातून घेण्यात आल्याची माहीती समोर आली. त्यानुसार बनावट कागदपत्र देऊन सिमकार्ड अॅक्टीवेट करणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या दुकानदाराला अटक केली. आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याच्या साथीदारांनाही उत्तर प्रदेशातून अटक केली. आत्तापर्यंत सहा जणांना अटक केलीय. या आरोपींच्या विराधात उत्तर प्रदेशातही गुन्हे दाखल असल्याचंही पोलिस तपासात समोर आलंय. आरोपींवर भा द वि च्या कलम 419, 420, 465, 468, 471, 34 सह माहीती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींकडून पाच मोबाईल बँक अकाऊंटमध्ये काही रक्कम जप्त करण्यात आलीय.

loading image
go to top