नवी मुंबई : पक्ष्यांची किलबिलाट गुंजतेय

खारघर, सीबीडी बेलापूरमध्ये देशी विदेशी पाहुण्यांचे आगमन
 birds
birdssakal media
Updated on

सुमित्रा चव्हाण : सकाळ वृत्तेसवा

खारघर : नोव्हेंबर महिना हा परदेशी आणि हिमालयातील स्थलांतरित पक्ष्यांचा (himalaya birds) महाराष्ट्रात येण्याचा काळ आहे. सध्या नवी मुंबईतील (Navi mumbai) सीवूड्स, बेलापूर आणि खारघरच्या खाडीकिनाऱ्यावर (bay side) उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आशिया, नेपाळ, तिबेट, लडाख आदी देश-विदेशातील पक्ष्यांचे (international birds) आगमन झाले आहे. या दुर्मिळ पक्ष्यांचा किलबिलाट शहरात गुंजत असून पक्षीप्रेमींसाठी (bird lovers) पर्वणी ठरत आहे. ५ ते १२ नोव्हेंबर या पक्षी सप्ताहानिमित्त या परिसरांत येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात पक्ष्यांविषयी माहिती मिळावी यासाठी जनजागृती (piblic awareness) केली जात आहे.

 birds
पालघर जिल्ह्याला सौरऊर्जेने दाखवला उन्नतीचा मार्ग

नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईतील सीवूड्स आणि खारघरच्या खाडी किनाऱ्यावर जलाशयात उत्तर अमेरिका, युरोप, उत्तर आशिया, नेपाळ, तिबेट, लडाख आदी देश-विदेश पक्ष्यांचे आगमन होत असते. या काळात दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडत असल्याने पक्षीप्रेमींची गर्दीही असते. खारघरमधील सेक्टर १६ वास्तुविहार ते सेक्टर २७ रांजणपाडा गावालगत असलेल्या खाडीकिनाऱ्यावर तीन वर्षांपासून देशविदेशातील विविध प्रकारचे पक्षी खाद्याच्या शोधात येत आहेत. थंडीची चाहूल सुरू होताच खारघर खाडीकिनाऱ्यावर सोन चिखल्या पक्ष्याचे आगमन झाल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

थंडीत अमेरिका, युरोप, देशातील करड्या रंगाचे पिनटेक आणि नेपाळ, तिबेटमधील ब्राह्मणी नावाचे बदकाचा वावर अधिक असतो. सध्या किनाऱ्यावर शिकारी पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यात युरोपमधील काळ्या शेपटीचा आणि लांब पाय असलेला मलगुझा पक्षी सरळ आणि बारकी चोच असलेला (common Snipe) पाणलावा, तितरपेक्षा लहान उंचीचा काळ्या व पिंगट (common redshank) टिलवा, (wood Sandpiper ) लांब पायाचा लाकूड सॅंडपिपर असे विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळत आहेत.

सीबीडी पाच, आठ आणि सेक्टर नऊ हा डोंगराला लागून असल्यामुळे परिसरात विविध जातींचे पक्षी आढळून येतात. विशेषतः सीबीडी सेक्टर नऊमधील व्हॅलीपार्क हा निसर्गरम्य आणि डोंगराळ परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी विविध पक्ष्यांचा किलबिलाट असतो. पक्षी नियमितपणे असावे, यासाठी परिसरातील निसर्गप्रेमींनी येथील झाडावर घरटी, पाणवठे उभारले आहे. थंडीची चाहूल लागताच हिमालयातील पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात, असे पक्षीप्रेमींनी सांगितले.

 birds
बदलापूर : बांधकाम व्यावसायिकाकडून दहा लाखांची खंडणी घेणारे अटकेत

३० पेक्षा अधिक जाती
सीवूड्स आणि खारघर खाडीकिनारी रोहित, सारस बगळे, सोन चिखल्या, रेड बुलबुल, कॉमन किंगफिशर, पॅसिफिक गोल्डन प्लेव्हर, सॅन्डपीपर, जांभळा हेरॉन मार्श हॅरियर चिमणी, घार, गरुड, किंगफिशर, राघू, दाबील, अडई, सरग्या, शेकाट्या अशा जवळपास ३० पेक्षा अधिक जातींचे देश विदेशातील पक्ष्यांचा किलबिलाट असतो.

नागरिकांना पक्ष्यांची माहिती मिळणार

खारघर सेक्टर ३५ तळोजा जेलच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात कोतवाल, काळे कोतवाल, कवड्या खंड्या, फुलटोच्या, रान कस्तुर (तांबट पक्षी) टकला गरुड, कापशी घार, दयाळ, राखी कोहकाळ, तसेच खारघर खाडीकिनारी समुद्र गरुड, पाणकोंबडी, तसेच देशी आणि विदेशी पक्षी आढळून येतात. नुकतीच थंडी सुरू झाली आहे. खारघर खाडीकिनाऱ्यावर सोनचिखल्या पक्ष्याचे आगमन झाले आहे. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात हे विदेशी पक्षी येतात. यावर्षी नागरिकांना पक्ष्यांची माहिती व्हावी, यासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खाडीकिनारी मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात येणार आहे, असे पक्षीतज्ज्ञ ज्योती
नाडकर्णी यांनी सांगितले.

पक्षी सप्ताह दिनानिमित्त जनजागृती

ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबरला, तर ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोंव्हेंबरला असते. सर्वसामान्यांमध्ये पक्ष्यांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राज्य सरकारने राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज्याच्या वनविभागामार्फत या आठवड्यात पक्ष्यांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. या सगळ्याचे औचित्य साधून या सप्ताहाला पक्षी संवर्धनाची जोड दिली आहे. वन विभागासह राज्यातील विविध पक्षीमित्र आणि संस्थांतर्फे या कालावधीत जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत.


सीबीडी सेक्टर नऊ व्हॅलीशिल्प परिसरात दाट जंगल आहे. डोंगराला लागून असल्यामुळे हिमालय आणि इतर भागातील पक्षी येतात. त्यात प्रामुख्याने टिकल्स कस्तुर, भवईवाला कस्तुर मलबार कस्तुर, जंगली लाल कोंबडी, केशरी डोक्याचा कस्तुर, पांढऱ्या भुवईचा बुलबुल, कोकिळा आदी पक्षी या परिसरात आढळून येतात. हिवाळ्यात बाहेरील पक्ष्यांचे स्थलांतर होत असल्यामुळे या ठिकाणी पक्षी प्रेमींची गर्दी होत असते.
- गौरव कारंडे, निसर्गप्रेमी

खारघर हा जिल्ह्याचा शेवटचा टोक आहे. या ठिकाणी पक्षीप्रेमींसाठी एक दोन संस्था नेहमी जागृतीचे काम करत असतात. आम्ही त्यांच्या नेहमी संपर्कात असतो.
- आशीष ठाकरे, जिल्हा वनसंरक्षक अधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com