बदलापूरच्या जैवविविधतेवर आंतरराष्ट्रीय मोहोर! स्थानिक तरुणांच्या छायाचित्रांना "सेंच्युरी एशिया'चा पुरस्कार 

बदलापूरच्या जैवविविधतेवर आंतरराष्ट्रीय मोहोर! स्थानिक तरुणांच्या छायाचित्रांना "सेंच्युरी एशिया'चा पुरस्कार 

बदलापूर : वन्यजीवन आणि पर्यावरणाला वाहिलेल्या प्रतिष्ठित "सेंच्युरी एशिया' या मासिकाच्या छायाचित्रण स्पर्धेत यंदा बदलापूरमधील तिघांच्या छायाचित्रांना पारितोषिके जाहीर झाली आहेत. त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेवर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. 

बदलापूर परिसरातील जैवविविधता टिपणाऱ्या प्रतीक प्रधान याला प्रथम, सीताराम राऊळ याला द्वितीय; तर मंदार घुमरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहेत. आशिया खंडातील विविध देशांमधून आलेल्या हजारो प्रवेशिकांमधून प्रतीक प्रधान यांनी काढलेल्या "फ्रॅन्टम क्रेन फ्लाय' या कीटकाच्या छायाचित्राने दीड लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. सीताराम राऊळ या तरुणाने टिपलेल्या वटवाघुळाच्या छायाचित्रास 50 हजार रुपयांचे; तर मंदार घुमरे याने काढलेल्या एक विशिष्ट प्रकारचे मशरूम आणि पतंगाच्या छायाचित्रास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. विशेष म्हणजे ते तिघेही बदलापूर शहरातील व्यावसायिक छायाचित्रण करणाऱ्या एकाच समूहाचे घटक आहेत. 
सह्याद्री पर्वतरांगांमधील माथेरान, बारवी परिसरातील वनसंपदा, बदलापूर शहराबाहेर पनवेलच्या वेशीवरील जंगल अशा विविध भागात फिरून हे तरुण आपला छायाचित्रणाचा छंद वाढवत आहेत. प्रत्येक ऋतूमध्ये दिसणारी निसर्गाची विविध रूपे त्यांनी आपल्या कॅमेऱ्याने टिपली आहेत. त्यांच्या या वन्यजीव छायाचित्रण कलेला अनेक मान्यवरांनी दाद दिली आहे. यापूर्वीही त्यांना काही पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या या कलेतून शहरालगतच्या जंगलातील जैवविविधतेची सचित्र नोंद होत आहे. 

लग्न, वाढदिवस, प्री वेडिंग शूटिंग आणि अशाच विविध समारंभाचे छायाचित्रण हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. त्याला प्राधान्य देऊन उर्वरित काळ निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना तेथील मनमोहक निसर्ग आणि वन्यप्राण्यांना, पक्षांना आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपतो. अनेकदा एका फोटोसाठी चार ते पाच तास वाट पाहावी लागते; मात्र मनासारखे छायाचित्र आले की केलेल्या कष्टांचे चीज होते. 
- प्रतीक प्रधान,
विजेता 

International bloom on Badlapurs biodiversity Century Asia award for photographs of local youth

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com