esakal | मुंबईत पेट्रोल 110.41 तर डिझेल 101.3 रुपयांवर; इंधनाचे दर स्थिर | Petrol-diesel
sakal

बोलून बातमी शोधा

petrol diesel price

मुंबईत पेट्रोल 110.41 तर डिझेल 101.3 रुपयांवर; इंधनाचे दर स्थिर

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील (International market) कच्चा तेलाच्या किमती (crude oil) कमी असतांना वाढत असलेले इंधनाचे दर गेल्या महिन्यापर्यंत चढ उतार होऊन काही महिने स्थिर होते. मात्र, सप्टेंबर अखेर पुन्हा दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर मुंबईत सध्या पेट्रोल (petrol) पाठोपाठ डिझेलच्या दराने (diesel) सुद्धा सेंच्युरी मारली आहे. दरम्यान सातत्याने होणारी दरवाढ मंगळवारी स्थिर झाली असून, मुंबईत पेट्रोल 110.41 तर डिझेल 101.3 रुपये प्रति लिटर दराची नोंद करण्यात आली.

हेही वाचा: लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज : मुंबईत 35 लाख मुलांचं टार्गेट

मुंबईसह राज्यभरात पेट्रोलच्या दरानंतर डिझेलच्या दराने भडका घेतला आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट महागल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आधीच अनेकांचे रोजगार गेले असून,सर्वसामान्य बेरोजगार झाले आहे. छोटे उद्योग बंद पडले आहे. अशा परिस्थितीत वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे इंधनाच्या मूळ रकमेवर केंद्र आणि राज्य सरकारने लावण्यात आलेल्या विविध करामुळे अधिकाधिक इंधनाच्या दरात वाढ होत आहे.

गेल्या 7 दिवसातील इंधनाचे वाढते दर

तारीख - पेट्रोल - डिझेल

6 सप्टेंबर - 108.96 - 99.17

7 सप्टेंबर - 109.25 - 99.55

8 सप्टेंबर - 109.54 - 99.92

9 सप्टेंबर - 109.83 - 100.29

10 सप्टेंबर - 110.12 - 100.66

11 सप्टेंबर - 110.41 - 101.3

12 सप्टेंबर - 110.41 - 101.3

loading image
go to top