international women day 2023 : गीतांजली टेमगिरे यांना "समाज संजीवनी" पुरस्कार जाहीर

समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून समाजासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा गौरव " समाज संजीवनी
गीतांजली टेमगिरे
गीतांजली टेमगिरेsakal

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "साहित्यसंपदा" संस्थेमार्फत दिला जाणारा "समाज संजीवनी" पुरस्कार जाहीर यंदा राज्यकर उपआयुक्त गीतांजली टेमगिरे यांना जाहीर झाला आहे.

समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून समाजासाठी योगदान देणाऱ्या स्त्रियांचा गौरव " समाज संजीवनी" पुरस्काराने करण्यात येतो. साहित्य, समाज,कला,क्रीडा,शिक्षण राजकारण अश्या विविध क्षेत्रातील महिलांच्या विशेष कार्याची दखल घेतली जाते.

गीतांजली टेमगिरे या जीएसटी विभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या कार्याध्यक्ष असून "जीएसटी नवदुर्गा मंच या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आजपर्यंत कार्यालयीन कामकाज सांभाळत जीएसटी विभागात कर जनजागृती पथनाट्ये,एकपात्री प्रयोग, सूत्रसंचालन, राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण करून कार्याची वेगळी छाप पाडली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विशेषतः वित्त विभागात भागाच्या विविध योजनांच्या जाहिराती संबंधित विविध समित्यांवर प्रभावी कार्य करून त्यांनी आपले योगदान दिले आहे. याशिवाय जीएसटी नवदुर्गा मंच तर्फे जागर नवदुर्गांचा, बीजबंधन- रक्षाबंधन, काव्यसवित्री,वृक्षारोपण,पर्यावरण संवर्धन, व्यक्तिमत्व विकास,असे अनेक नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन साहित्यसंपदातर्फे त्यांना "समाज संजीवनी" पुरस्कार जाहीर जाहीर झाला, त्याबद्दल जीएसटी विभाग तसेच सर्व सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com