महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा डाव; कॉंग्रेसचे सचिन सावंत यांचा आरोप

महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा डाव; कॉंग्रेसचे सचिन सावंत यांचा आरोप


मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्‍त हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलीवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा हा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलीवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योजक तसेच बॉलीवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. 

यासंदर्भात सावंत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलीवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षड्‌यंत्र मागील काही महिन्यांपासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलीवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंह प्रकरणापासून कसे केले जात आहेत, हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत अजयकुमार बिष्ट यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न 2014 पासूनच होतो आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षड्‌यंत्र करून गुजरातला नेले गेले. आता बॉलीवूडचे महत्त्व कमी करून उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलीवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलीवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन सावंत यांनी केले. 

वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न! 
अजयकुमार बिश्‍त यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तर प्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. बिश्‍त यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. 
Intrigue to shift investment from Maharashtra to Uttar Pradesh Congress Sachin Sawants allegation  

---------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com