Iqbal Singh Chahal : चार तास ईडी चौकशी काय घडलं? इक्बाल सिंग चहल अखेर बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Iqbal Singh Chahal

Iqbal Singh Chahal : चार तास ईडी चौकशी काय घडलं? इक्बाल सिंग चहल अखेर बोलले

मुंबई : कोविड सेंटरमधील कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (सोमवार) चौकशीसाठी बोलावले होते. आतापर्यंत ईडीचे समन्स स्वीकारण्यास आयुक्त चहल यांनी नकार दिला होता. मात्र आज चहल यांनी चौकशीला हजेरी लावली. तसेच आपण ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. आज ईडी चौकशी संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

इक्बाल सिंग चहल म्हणाले, जून २०२० मध्ये राज्य शासनाने निर्णय घेतला होता. की मुंबईमध्ये महापालिकेअंतर्गत आपल्याकडे ४ हजार सुद्धा बेड नव्हते. जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्याकडे ३७० बेड होते. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाख असताना हे बेड फार कमी होते."

"मात्र जेव्हा कोरोना बाधितांची संख्या वाढली. ११ लाख लोख बाधित झाले तेव्हा राज्य सरकारने निर्यण घेतला की आपल्याला खुल्या मैदानात जम्बो कोवीड सेंटर उभे केले पाहीजेत. त्यानुसार महापालिकेने शासनाला निवेदन केले की बीएमसी कोरोनाचा सामना करण्यासाठी अत्यंत व्यस्त आहे. आम्हाला बांधकाम करायला वेळ नाही," असे चहल म्हणाले.

हेही वाचा: Rishabh Shetty : पुष्पातील श्रीवल्लीवर कांतारातील रिषभ भडकला! म्हणाला, "मला अशा अभिनेत्री सोबत..."

"त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी उभारण्यात आलेले कोविड सेंटर वेगवेगळ्या बिगर सरकारी संस्थांनी बांधले. त्यामुळे हे कोविड सेंटर उभारण्यात बीएमसीला शून्य रुपये खर्च आला. आमचे योगदान शुन्य होते. मुंबईत असे एकूण दहा जम्बो कोविड सेंटर बांधण्यात आले. यातील एका जम्बो कोविड सेंटरबाबात मुंबई पोलिसांकडे एक तक्रार दाखल झाली,” असे इक्बाल सिंग चहल म्हणाले. 

हेही वाचा: Maharashtra Kesari: सिकंदर विरोधात चार गुण देणाऱ्या पंचाला पोलिस शिपायाने दिली धमकी

टॅग्स :Mumbai NewsBMC