esakal | आज मुंबईतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbaikars

आज मुंबईतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय होणार?

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील कोविडचे निर्बंध शिथील (covid restriction) होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून (state govt) याबाबत आज निर्णयाची शक्यता आहे. यात, दुकानांच्या वेळा (shop timing) वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय (positive decision) होण्याची शक्यता आहे. मात्र,लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. (Is govt will take decision to relax covid restriction in mumbai dmp82)

मुंबईतील कोविड पॉझिटीव्ह रेट दिड टक्क्यांच्या खाली आहे. तर,कोविड ऑक्सिजन बेडही 20 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेला आहे. याबाबतचा दैनंदिन अहवाल राज्य सरकारला पाठवला जात आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. गुरुवारी राज्य सरकारकडून आठवडाभराचा आढावा घेऊन निर्णय घेतला जातो. या आठवड्यात मुंबईतील काही नियम शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सध्या दुकाने कार्यालये संध्याकाळी 4 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसेच,शनिवार,रविवारी फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी आहे. त्यात आता सुधारणा होऊन दुकाने संध्याकाळ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी मिळू शकते. सर्वच स्तरातून आता लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा: ईडीच्या रडावर बडे व्यावसायिक; पाहा व्हिडिओ

लोकलसेवा तुर्तास नाही

लशीचे दोन घेतलेल्यांना लोकल मधून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. तसेच,लोकल सेवेसाठी आंदोलनेही सुरु झाली आहेत. मात्र,तत्काळ लोकल सेवा सामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाली तरी त्याचा फारसा फायदा होणार नाही.लोकल प्रवाशांच्या तुलनेने ही संख्या अत्यंत कमी आहे.

loading image
go to top