
कल्याण : डोंबिवलीलगत असलेली 18 गावे पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार तसेच पालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष विनंती अर्ज दाखल केला आहे. आज 22 जानेवारी रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. या पहिल्याच सुनावणी न्यायालय संबंधितांना काय निर्देश देणार यावर 18 गावांचे भवितव्य ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोप्पंना तसेच न्यायमूर्ती व्ही. सुब्रमण्यम यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने ही सुनावणी होईल. डिसेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने 18 गावांच्या स्वतंत्र उपनगर नगरपरिषदेचा राज्य सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत ही गावे पुन्हा कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते. यावर राज्य सरकार तसेच पालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष विनंती अर्ज दाखल केला होता. या दोनही अर्जांवर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीमध्ये पालिका तसेच सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयावर जैसे थे ची मागणी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर त्याचे थेट परिणाम होतील. या विशेष विनंती अर्जांवर निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्यात यावी अशी विनंती वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली आहे. त्यांच्यातर्फे . संदीप सिंग न्यायालयात बाजू मांडतील. कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे सम्राट शिंदे तर राज्य सरकारतर्फे सचिन पाटील न्यायालयात बाजू मांडतील.
----------------------------------------------------------
issue of 18 villages in Dombivali Hearing before three justices of the Supreme Court
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.