esakal | माझ्यावरच्या आरोपांचा तपास करणं, ही राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी - प्रताप सरनाईक
sakal

बोलून बातमी शोधा

Pratap Sarnaik

माझ्यावरच्या आरोपांचा तपास करणं, ही राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी - प्रताप सरनाईक

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: ठाण्याचे शिवसेना आमदार (thane shivsena mla) प्रताप सरनाईक (pratap sarnaik) सुद्धा अनिल देशमुख यांच्याप्रमाणे ईडीच्या (ed) रडारवर आहेत. आज सभागृहात प्रताप सरनाईकांनी या संदर्भात आपली बाजू मांडली. "केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे. त्याचा प्रताप सरनाईकही एक भाग आहे. मगाशी चर्चा चालू असताना, छगन भुजबळ, अनिल देशमुख (anil deshmukh) यांची नावं घेतली गेली. पण प्रतास सरनाईकची सुद्धा चौकशी सुरु आहे. सात महिन्यांपासून तपास यंत्रणांना सामोरा जातोय" असे प्रताप सरनाईक म्हणाले. (It is the responsiblity of state govt to enquiry of allegations against me pratap sarnaik)

"महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. काल मी गृहमंत्र्यांना एक पत्र दिलं. एमएमआरडीला सुरक्षा रक्षक पुरवण्यात आम्ही करोडो रुपयांचा घोटाळा केलाय, असा माझ्यावर आरोप होतोय. आर्थिक गुन्हे अन्वेक्षण विभागात या संदर्भात तक्रार दाखल झाली. या प्रकरणाचा तपास नंतर ईडीने स्वत:कडे घेतला. हा घोटाळा झाला आहे की, नाही, याचा तपास करण्याची राज्य सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. मी सत्ताधारी पक्षाचा शिवसेनेचा आमदार आहे. माझ्यावर होणारे आरोप कदाचित राज्य सरकारवर सुद्धा होत असतील" असे सरनाईक म्हणाले.

हेही वाचा: प्रताप सरनाईक मुंबईबाहेरुन आल्यानं क्वारंटाईन, ईडीला विनंती पत्र सादर करणार

"गृहमंत्र्यांना काल जे पत्र दिलं, त्या संदर्भात पुढे काय झालं? त्याची माहिती सरनाईकांनी गृहमंत्र्यांना देण्याची विनंती केली. प्रताप सरनाईकने घोटाळा केला असेल, तर तो गजाआड गेला पाहिजे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण घोटाळा झाला नसेल तर गृहखात्याने ती माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी" अशी मागणी सरनाईक यांनी केली.

loading image