सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही; कोण देतंय कंगनाला संरक्षण? वाचा

तुषार सोनवणे
Friday, 4 September 2020

कंगनाची पाठराखण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले पुढे आले आहेत. त्यांनी तीला संरक्षण देण्याचे म्हटले आहे.

मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वेळो वेळी व्यक्त होणारी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर समाजमाध्यमांसह इतर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच तीच्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असे म्हटले आहे. परंतु कंगनाची पाठराखण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले पुढे आले आहेत. त्यांनी तीला संरक्षण देण्याचे म्हटले आहे.

तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका

कंगना रानौत आणि खासदार संजय राऊत यांच्यात सुरू असलेला ट्वीट वार टोकाला गेला असताना त्यात आता रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is not right to threaten the ruling Shiv Sena; Who protects Kangana? Read o