मुंबईतील लॉक डाऊन संपला काय ? हे काय, व्हिडीओ पाहा...  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 एप्रिल 2020

लॉक डाऊन मधून आज राज्य सरकारने सशर्त सुट दिल्यावर मुंबई शहरात आज पुन्हा गर्दी उसळली होती. रस्त्यावरही वाहानांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई , ता. 20:  लॉक डाऊन मधून आज राज्य सरकारने सशर्त सुट दिल्यावर मुंबई शहरात आज पुन्हा गर्दी उसळली होती. रस्त्यावरही वाहानांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. टोल नाक्यापासून थेट दादर पर्यंत आज वाहांनांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळतेय. ठाणे, वाशी टोल नाक्यांवर देखील अशीच स्थिती आहे.   

मोठी बातमी - "समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

बांधकाम, वित्त, वैद्यकिय, ई कॉमर्स अशा विविक्षेत्रातील व्यवसायांना आज पासून सुट देण्यात आली आहे. अनेक दिवसांनी लॉक डाऊन मधून सुट मिळाल्याने शेकडो वाहाने रस्त्यावर उतरली होती. त्यातच टोल वसुली सुरु झाल्याने टोल नाक्यावर वाहानांची गर्दी झाली होती. टोल नाक्यावर पोलिस विचारपुस करुन वाहाने पुढे पाठवत होते .मात्र त्यालाही मर्यादा होत्या.

शिक्षकाचा दावा, गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं कोरोनाचं औषध...

टोल नाक्यांवरुन येणार्या वाहानांमध्ये शहरातील वाहानांचीही भर पडत होती. दादर परळ या भागात नेहमी प्रमाणेच वाहानांची गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आर्थिक चाकं रुळावर आणण्यासाठी ही सुट दिली असतानाच वेळो-वेळी अंदाज घेऊन या निर्णयाचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान मुंबईत देशातील सर्वाधिक रुग्ण आढळलेले असतानाही आज वाहानांची वर्दळ प्रचंड वाढली होती. त्यामुळे मुंबईतील लॉक डाऊन संपला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. 

it seems lock down in mumbai city is over read full story on lockdwon extension

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: it seems lock down in mumbai city is over read full story on lockdwon extension