Dr. Tatyarao Lahane : "तुरुंगात जाऊ पण..." ; डॉ. लहाने यांनी उद्विग्नपणे केले जाहीर

Dr. Tatyarao Lahane
Dr. Tatyarao Lahane

Dr. Tatyarao Lahane : मुंबईतील प्रसिद्ध जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ प्रमुख डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ रागिणी पारेख यांनी ९ डॉक्टरांसमवेत राजीनामा दिला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या डॉक्टरांचे राजीनामे स्वीकारल्याची माहिती मिळालेली नाही. या डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे जेजे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे काम ठप्प झाले आहे. निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या दबावामुळे त्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे.

मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानेही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल केल्याची माहिची देखील केली आहे. (Dr. Tatyarao Lahane resignation)

दरम्यान डॉ.तात्याराव लहाने यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. ते राजीनाम्यावर ठाम आहेत. "जे-जे रुग्णालयात जाणार नाही. आजपासून आमचा आणि जे. जे. रुग्णालयाचा संबंध संपला. वेळ पडली तर चॅरीटी करु पण जेजे मध्ये जाणार नाही. आमची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यात आले. आमच्यावर झालेले सर्व आरोप क्लेशदायक आहेत. रूग्णांसाठी आम्ही तुरूंगात जाऊ पण रूग्णसेवा आयुष्यभर केली आहे ती कधीच सोडणार नाही. प्राध्यापकांवर दबाव आहे. त्यांना घरी पाठवले आहे", असे लहाने यांनी स्पष्ट केले.

निवासी डॉक्टरांच्या संघटनेने नेत्ररोग विभागातील काही डॉक्टरांवर अनियमिततेचा आरोप केला होता. याची चौकशी केली जात होती, मात्र ज्या डॉक्टरांच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत त्यांचे ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे, असे लहाने यांनी स्पष्ट केले. 

Dr. Tatyarao Lahane
Ashwini Matekar : ठाकरे गटाला मोठा झटका ! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नेत्याचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

अजित पवार यांचा हस्तक्षेप -

मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामूहिक राजीनामा दिला आहे. तसेच रुग्णालयातील मार्डच्या ७५० निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप पुकारला आहे. जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर दुष्परिणाम होत आहे. यासंदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांनी तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले, लोकोपयोगी आरोग्य संस्थेच्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये असा वाद असणं योग्य नाही. हा वाद राज्याच्या आरोग्यसेवेसाठी मारक असल्यानं ताबडतोब थांबला पाहिजे. अशा प्रकारचे वाद चिघळू न देता तातडीनं मिटवले पाहिजेत. यावर समाधानकारक तोडगा काढून रुग्णांचे हाल थांबवले पाहिजेत. जेजे हॉस्पिटल सारख्या संस्थेत शिस्त पाळली गेली पाहिजे. हे सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे. 

डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्तीनंतरही सेवा देत आहेत. त्यांच्यासारख्या अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आरोग्यसेवेला नेहमीच असणार आहे. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह सर्वच वरिष्ठ डॉक्टरांना त्यांचे राजीनामे मागे घेण्यास सांगावे. मार्डच्या निवासी डॉक्टरांचंही समाधान होईल असा सर्वमान्य, रुग्णांच्या, राज्याच्या हिताचा तोडगा काढण्यात यावा, असे अजित पवार म्हणाले.

Dr. Tatyarao Lahane
Rohit Pawar: अहमदनगरच्या नामांतराचे श्रेय कोणाला? रोहित पवारांनी सांगितलं; राजकारण तापण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com