'डॉक्टर बॉम्ब'ला कानपूरमधून घेतलं ताब्यात..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मुंबईतून फरार होता डॉक्टर बॉम्ब.. 

मुंबई - जलिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब ला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून ताब्यात घेण्यात युपी एसटीएफला यश आले आहे. त्याच्याकडून 47 हजार रोकड, आधार कार्ड मोबाईल आणि एक छोटी डायरी जप्त करण्यात आली आहे. अब्दुल टुंडाचा शिष्य असलेला जलिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब हा पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन बांग्लादेश मार्गे भारतात आला होता. त्यानंतर त्याने इंडियन मुजाहिदिनसोबत मिळून 50 हून अधिक बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा संशय आहे.

कानपूर येथील फेथफुलगंज येथून त्याला यूपी एसटीएफने दुपारी ताब्यात घेतले.

Inside Story : डॉक्टर बॉम्ब आहे तरी कोण ? 

कोण आहे जलिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब

मोहम्मद जालिस अन्सारी उर्फ डॉक्टर बॉम्ब हा मूळचा मुंबईतील आगरीपाडा  येथील मोमीनपुरा इथला रहिवासी होता. विशेष म्हणजे डॉक्टर बॉम्ब हा MBBS डॉक्टर आहे.

डॉक्तर बॉम्ब हा एक दोन नव्हे तर तब्बल ५० बॉम्बस्फोट घडवून आणणारा आरोपी आहे. १९९३ च्या अजमेर बॉम्बस्फोटात त्याला दोषी ठरवत न्यायलयनं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबईतील साखळी बॉम्ब-ब्लास्टमध्ये देखील त्याचा हात होता.  

डॉक्टर बॉम्ब १९९४ पासून जेलमध्ये आहे. अजमेरमध्ये ५ आणि ६ डिसेंबर १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात तो दोषी होता.

jalis ansari aka dr bomb arrested from kanpur by uttar pradesh ATS 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalis ansari aka dr bomb arrested from kanpur by uttar pradesh ATS