esakal | उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम

जपान व भारत यांच्यातील चौथ्या संयुक्त नौदल कवायतींना आजपासून अरबी समुद्राच्या उत्तर दिशेला सुरुवात झाली. या कवायती तीन दिवस चालतील. 

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : जपान व भारत यांच्यातील चौथ्या संयुक्त नौदल कवायतींना आजपासून अरबी समुद्राच्या उत्तर दिशेला सुरुवात झाली. या कवायती तीन दिवस चालतील. 

लग्नाबाबतचा ट्रेंड बदलतोय ; 76 टक्के मराठी तरुण, तरुणी स्वत:च लग्नाचा निर्णय घेतात

2012 पासून सुरू झालेल्या या कवायती नियमितपणे दर दोन वर्षांनी होतात. यापूर्वीची कवायत विशाखापट्टणम येथे 2018 मध्ये झाली होती. त्यामुळे दोनही देशांमधील नौदल सहकार्य वाढत असल्याची भावना व्यक्त केली  जात आहे. यावर्षीच्या कवायतींमध्ये भारतातर्फे रडारवर न दिसणारी विनाशिका चेन्नई, तेग वर्गातली फ्रीगेट तरक्ष, इंधनपुरवठा करणारा टँकर दीपक आणि पी 8 आय हे समुद्रात लांब पल्ल्याची गस्त घालणारे लढाऊ विमान तसेच हेलिकॉप्टर व नौदलाची लढाऊ विमाने सहभागी आहेत. जपानच्या अत्याधुनिक युद्धनौका देखील या कवायतींमध्ये सहभागी झाल्या आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा कोविड क्रुसेडर्स 2020 अवॉर्डने गौरव

दोन्ही देशांच्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली या कवायती होत आहेत. यात क्षेपणास्त्रे तसेच तोफगोळे डागणे, एकमेकांच्या युद्धनौकांवर हेलिकॉप्टर उतरवणे, युद्धनौका व पाणबुड्यांवर विमानातून हल्ला करणे आदींचा सराव केला जात आहे. सध्याच्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर फक्त समुद्रातच तसेच नौसैनिकांचा एकमेकांशी निकट संपर्क येणार नाही अशा पद्धतीने या कवायती होत आहेत. ही माहिती नौदलाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top